मूलतः उत्तर दिले: आपण जेंव्हा मोबाइल recharge करतो तेंव्हा कुठलीही टेलिकॉम कंपनी महिन्याचे २८ दिवसच का पकडते?
कारण टेलिकॉम कंपनीला 12 महिन्यांच्या ऐवजी 13 महिन्याचा पैसा पाहिजे असतो.खाली तुम्ही आकडेवारी पाहू शकता की टेलिकॉम कंपनी, का रेचार्ज करताना 31 दिवसा ऐवजी 28 दिवस का पकडते.

1.एका वर्षात 4 महिने, 30 दिवसांचे असतात.तर यामध्ये त्यांना फुकटचे 8 दिवस मिळाले.

2.7 महिने 31 दिवसांचे तर यामध्ये 21 दिवस राहतात.

3.1 महिना फेब्रुवारी ज्यामध्ये 28/29 दिवस असतात.राहिले 3 दिवस.

म्हणजे एकूण 31/32 दिवस राहतात.जर तुम्ही वर्षभरात सलग 12 वेळा रेचार्ज केलात तर आणि एकदा तुम्हाला रीचार्ज करायला लागतो.

जर टेलिकॉम कंपनीने 30/31 दिवसांची रीचार्ज valitidy दिली असती तर तुमच्याकडून ते एका वर्षात 12 महिन्यांचे पैसे वसूल केले असते.पण 28 दिवसांच्या कालावधी मुळे त्यांना आणि एक महिन्याचा पैसे अतिरिक्त मिळतात.

सुरुवातीला फक्त एकच टेलिकॉम कंपनीने हा 28 दिवसांचा प्लॅन सुरू केला नंतर राहिल्यान्यांनी पण याचे अनुसरण केले.

Share.