जॅकी श्रॉफ जितका फिल्मी आहे त्याची लव्हस्टोरी ही तितकीच फिल्मी आहे. जॅकी श्रॉफ एकाच वेळी दोन मुलींना डेट करत होते. आयेशाला पहिल्यांदा भेटले तेव्हा जॅकी दादा एका मुली सोबत रिलेशनशिपमध्ये होते. ती मुलगी पुढे अमेरिकेला निघून गेली. अमेरिकेतुन परतल्यावर लग्न करायचे असं दोघांनी ठरवले. दरम्यान आयेशानी जॅकी दादांना प्रोपोस केले. पण जॅकी दादांनी नकार दिला व आपले दुसऱ्या मुलीवर प्रेम असल्याचे सांगितले. पण कालांतराने त्यांचे ब्रेकअप झाले. त्यावेळी आयेशने जॅकीला धीर दिला.
आयेशा श्रॉफ एक ‘आर्मी कीड’ आहेत. त्यांचे वडील एअर मार्शल ह्या पदावरून निवृत्त झालेत. जॅकी हिरो होण्याआधी फार गरीब होते. आयेशा आणि जॅकीची भेट झाली तेव्हा आयेशा फक्त 13 वर्षाच्या होत्या. हळू हळू त्यांचं नातं मजबूत होत गेलं. बरीच वर्षे लिव्ह इन रीलशनशिपमध्ये राहिल्या नंतर त्यांनी लग्न केले.
एका इंटरव्ह्यू दरम्यान जॅकी म्हणाले, “आयेशा माझ्या आयुष्यात एखाद्या देवते सारखी आली आणि सगळं बदलून टाकलं. तिच्यामुळे मी यशस्वी झालो. तिच्यासाठी मी स्वतःला बदललं. तिचं माझ्यावर इतकं प्रेम होतं की ती माझ्या सोबत चाळीत राहायला देखील तयार होती. हे बघून मी स्वतःला बदलायचं ठरवलं. तिच्या मित्र-मैत्रीणींना भेटताना मी स्वतःला व्यवस्थित ठेवत असे.”
जॅकी श्रॉफ ह्यांनी एअर इंडिया मध्ये फ्लाइट अटेंडंट ह्या पदासाठी अर्ज केला होता. पण ते न्यूनतम योग्यता पास न झाल्यामुळे त्यांना रिजेक्ट करण्यात आले. जॅकी श्रॉफ हे उत्तम स्वयंपाक करतात आणि त्यांनी ताज हॉटेलमध्ये शेफ अप्रेन्टिस पदासाठी देखील अर्ज केला होता. पण त्यासाठी आवश्यक असलेली पदवी नसल्याने त्यांना नाकारण्यात आले.
जगगु दादांचे वडील ज्योतिषी होते आणि ‘माझा मुलगा सुपरस्टार होणार’ अशी भविष्यवाणी त्यांनी केली होती जी खरी ठरली. आज जॅकी श्रॉफ एक सुपरस्टार आहेत. त्यांचा मुलगा ही मनोरंजन क्षेत्रात खूप मोठा स्टार झालाय. बिकट परिस्थितीशी लढून यश कसं मिळवतात ह्याचं एक उत्तम उदाहरण आहेत जॅकी श्रॉफ. त्यांच्या या संघर्षाला सलाम.