Ahmednagar : नगर भंडारदरा पाणलोटात पावसाचा जोर वाढल्याने धरणात गत 24 तासात 100 दशलक्ष घनफूट पाणी नव्याने दाखल झाले आहे. 11039 दलघफू क्षमतेच्या भंडारदरा धरणामध्ये काल सायंकाळी 2570 दलघफू पाणीसाठा झाला होता. पावसाचा जोर असाच टिकून राहिल्यास आजरात्री उशिरापर्यंत हे धरण 25 टक्के भरलेले असेल. काल दिवसभरात पडलेल्या पावसाची नोंद भंडारदरात 30 मिमी झाली आहे.

भंडारदरा धरणात काल पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे गेल्या 24 तासात नव्याने 100 दलघफू पाणीसाठा नव्याने वाढला आहे. पावसाचा जोर असाच टिकून राहिल्यास आज रात्रीपर्यंत भंडारदरा धरण 25 टक्के भरले जाणार आहे.

काल सकाळी संपलेल्या 24 तासात भंडारदरा 30, घाटघर 40, पांझरे-35, रतनवाडी-107, वाकी 23 मिमी पावसाची नोंद झाली आहे. पाणलोटात पाऊस वाढल्याने डोंगर दर्‍यांमध्ये धबधबे जोरदार वाहू लागले असून ओढेनाले खळखळू लागले आहेत.

या काही दिवसात झालेल्या पावसामुळे भंडारदर्‍यातील नैसर्गिक सौंदर्य खुलू लागले आहेत. पडणार्‍या पावसामुळे शेतकर्‍यांना दिलासा मिळाला असून शेती कामाने वेग घेतला आहे.

Share.