🗓️ मंगळवार, 13 एप्रिल 2021
[sc name=”adg”]
मेष : दिवस व्यग्रतेत जाईल. तुमच्या कामाचे कौतुक केले जाईल. लहानांमध्ये मन रमेल. गप्पा-गोष्टींमध्ये वेळ घालवाल. फायद्याकडे लक्ष द्याल.
वृषभ : व्यावहारिक हजरजबाबीपणा दाखवाल. चातुर्याने व्यवहार कराल. आवडते पुस्तक वाचाल. पुढील गोष्टींचा अंदाज बांधाल.
मिथुन : चंचलपणे वागू नये. कलेतून चांगली कमाई होईल. लिखाण कराल. धोरणीपणे वागणे ठेवाल.
[sc name=”adg”]
कर्क : अति विचार करू नयेत. भावंडांची काळजी लागून राहील. स्मरणशक्तीला जोर द्यावा लागेल. आपलेपणाची जाणीव ठेवून वागाल.
सिंह : विरोधकांचा जोर मावळेल. हाताखालील लोक उत्तम सहकार्य देतील. व्यवहार कुशलता दाखवावी लागेल.
कन्या : नसत्या गोष्टीत अडकू नका. दिवस आळसात जाईल. स्वत:चा मानसिक गोंधळ उडवून घेऊ नका. पैशाचा योग्य विनिमय करावा.
[sc name=”adg”]
तूळ : हातात नवीन अधिकार येतील. पराक्रमाला अधिक बळ मिळेल. तुमच्या कामाच्या कक्षा रुंदावतील. भावंडांशी मतभेद संभवतात.
वृश्चिक : हातातील कामात यश येईल. आर्थिक गणिते सुटतील. बाहेरील अन्नपदार्थ टाळावेत. हित शत्रूंवर मात करता येईल.
धनु : चिंतन करण्यात वेळ घालवाल. जवळच्या प्रवासाचा योग येईल. नवीन गोष्टी जाणून घ्याल. आपल्या ज्ञानाचा योग्य वापर करता येईल.
[sc name=”adg”]
मकर : आवक-जावक यांचा मेळ घालावा. अनाठायी खर्च टाळावा. सामुदायिक गोष्टीत लक्ष घालू नका. धार्मिक यात्रेचे आयोजन करावे.
कुंभ : सर्व गोष्टी उत्तमरीत्या जाणून घ्याल. जास्त चिकित्सा करू नका. हटवादीपणा करू नये. हजरजबाबीपणा दाखवाल.
मीन : कागदपत्रे जपून ठेवावीत. घराबाहेर वावरतांना सावधानता बाळगावी. स्वतंत्र वृत्ती दर्शवाल. गायन कलेचे कौतुक केले जाईल.
[sc name=”adg”]