🔯 आजच्या बाराही राशींचे राशीभविष्य
🗓️ शनिवार, 17 एप्रिल 2021
मेष : आज आपल्याला अचानक धनलाभाचा योग आहे. आपल्या मित्रपरिवारांचे आपल्याला सहकार्य लाभेल. संतसज्जनांचा सहवास लाभेल. सरकार दरबारी असलेल्या कामास विलंब होण्याची शक्य आहे.
वृषभ : आज आपल्या रागावर आपण नियंत्रण ठेवावे म्हणजे कुटुंबातील कलह टळतील आपले निर्णय घरातील व्यक्तिंवर लादू नका. आर्थिक महत्वाचे व्यवहार टाळावेत. संततीस उच्च शिक्षणासाठी प्रवेश मिळविण्याचा प्रयत्न करणार्यांना यश मिळेल.
मिथुन : कौटुंबिक सुखाच्या दृष्टीने आजचा दिवस आपल्याला अनुकुल आहे. संततीसंबंधीतील गुंतवणूकीचे व्यवहार आजआपण कराल. मित्रपरिवाराबरोबर शोभेच्या वस्तूची खरेदी कराल. आज पाहुण्यांच्या स्वागतास सज्ज रहावे लागेल.
कर्क : आजचा आपला दिवस मानसिक प्रसन्नता देणार असेल. नोकरीत सहकार्यांच्या मदतीने आपली कामे पूर्ण होतील.विद्यार्थांना शैक्षणिक प्रगतीसाठी आजचा दिवस अनुकूल आहे. आपली मते डळमळीत ठेवू नका.
सिंह : आज आपण आर्थिक बाबींचे महत्वाचे निर्णय घेऊ नका. आपल्या संततीच्या उत्कर्षामुळे घरातील वातावरण अनुकूल राहिल. नोकरीत भाग्यकारक घटना घडतील. घरातील वातावरण आनंदी, उत्साही राहील.
कन्या : आपल्या मित्रमैत्रिणींकडून आज आपल्याला सुवार्ता समजतील आपल्याला अचानक धनलाभाचा योग आहे. आपण न बोलता एखाद्या कामाची कृती केली तर त्या कामाच्या पूर्ततेमुळे आपली प्रशंसा होईल.
तूळ : भागिदारी व्यवसायात आपले कार्यक्षेत्र वाढल्यामुळे भरपूर काम करावे लागेल. आज आपण आपल्या मित्रपरिवाराबरोबर सहलीला जाल मिष्टान्न भोजनाचा योग आहे. कामानिमित्त दूरचे प्रवास घडून येतील.
वृश्चिक : आर्थिक उन्नतीच्या दृष्टीने आपल्यासाठी आजचा दिवस अनुकूल आहे. भागिदारीत व्यवसाय करणारांचे कार्यक्षेत्र वाढविण्यास भागिदाराकडून मोलाची मदत होईल. बढती-बदलीसाठी नोकरीत केलेल्या प्रयत्नांना यश येईल.
धनू : आपले मनोबल वाढणार्या शुभघटना घडतील. आज आपण छोटे प्रवास कराल आपल्या भावंडांच्या गाठीभेटी होतील. व्यवसायात चांगला उत्क र्ष साधता येईल. अपेक्षित ठिकाणी बदली झाल्याने समाधान लाभेल.
मकर : आज आपल्या जोडीदाराबरोबर आपल्याला अचानक सहलीचा योग येईल. अपेक्षित गाठीभेटी होतील. प्रवासयोगामुळे आपल्याला अनपेक्षित विविध लाभ होतील. आपल्या बुद्घीचातुर्यावर मोठी मजल माराल.
कुंभ : वैवाहिक मतभेद टाळावेत. आपल्या घरी आज अचानक पाहुणे येतील. आज आपल्याला काही महत्वाची कर्तव्य पारपाडावी लागतील. अंधश्रद्धेला बळी पडू नका. कोणाकडूनही मदतीची अपेक्षा ठेवू नका. स्वावलंबी राहा.
मीन : संततीच्या शैक्षणिक भाग्योद्याच्या दृष्टीने आजचा दिवस अनुकूल आहे. घरात शोभेची मौल्यवान वस्तू खरेदी केलीजाईल. आपल्याला मानसिक प्रसन्नता लाभेल. व्यवसायीक उद्योगातील कामानिमित्त कर्ज प्रकरण रखडले असेल तर ते मार्गी लागेल.