Ahmednagar News : मागील आठवड्यापासून राज्यात मुसळधार पाऊस बरसत आहे. त्यातच हवामान खात्याने पुढील चार दिवस जिल्ह्यात अतिवृष्टीचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे नदीच्या पाणी पातळीत वाढ हाेण्याची शक्यता असून नदी काठच्या गावांना अलर्ट राहण्याचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.

नदीपात्रातील विसर्गात वाढ
हवामान खात्याच्या अंदाजानुसार जिल्ह्यात ११ ते १४ जुलै मुसळधार पाऊस पडणार आहे. जिल्ह्यात आजमितीला १६६.३ मिलीमीटर पाऊस पडलेला आहे. जिल्ह्यतून वाहणाऱ्या गाेदावरी नदीच्या विसर्गामुळे नांदूरमधमेश्वर बंधाऱ्यातून २७ हजार ८६८ क्युसेक, तसेच पुणे येथे झालेल्या जाेरदार पावसामुळे भीमा नदी येथील दाैंड पूल येथे २३ हजार ८१९ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरण क्षेत्रातही दमदार पावसाने हजेरी लावल्याने नदीपात्रातील विसर्गातही वाढ हाेण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे काटेकाेर पालन करावे. पूर पाहण्यासाठी गर्दी करू नये, त्याचप्रमाणे माेडकळीस आलेल्या इमारतीचा आसरा घेऊ नये. आपत्कालीन परिस्थितीत प्रशासनाच्या १०७७ या टाेल फ्री क्रमांकावर संपर्क करावा.

Share.