सध्याच्या काळात जगभरात कोरोनापासून बचावाचा एकमेव पर्याय व्हॅक्सीन घेणे हाच आहे. मात्र, व्हॅक्सीन घेण्यासाठी अजूनही काही लोक साईड इफेक्टला घाबरून व्हॅक्सीन घेणे टाळतात. देशभरात कोरोना लसीकरण केल्यानंतर प्रादुर्भाव नियंत्रणात येऊन देशातील तिसरी लाट रोखता येईल. याच कारणाने, देशभरातील लसीकरणाचा वेग वाढवला जात आहे.
मात्र, तुमच्यापैकी बऱ्याच लोकांनी आतापर्यंत कोरोना व्हॅक्सीनचा दोन्ही डोस घेतलेला असले. मात्र, ते घेण्यापूर्वी पेन किलर्स घेतल्या नसतील. डॉक्टरांनी तुम्हाला तसे सांगितले असेल. आता जागतिक आरोग्य संघटना देखील यावर आपले मत मांडत आहे
जागतिक आरोग्य संघटनेने लसीकरण करून घेण्यापूर्वी आता वेदनाशामक औषधे घेण्यास मनाई केली आहे. लसीकरण झाल्यावरच पेन किलर्स घ्यावे! त्याचे कारण पुढील प्रमाणे आहे! व्हॅक्सीन घेण्यापूर्वी वेदनाशामक घेतल्यास व्हॅक्सीन प्रति इम्यून रिस्पॉन्स कमी होतो. जर व्हॅक्सीन घेण्यासाठी जात असाल तर केवळ साईड इफेक्ट्स टाळण्यासाठी अशाप्रकारचे औषध घेऊ नये.
या गोष्टीचे आता पुरावे उपलब्ध झाले आहेत की, व्हॅकसीनसोबत हे औषध मिळून कसे रिअॅक्ट करते. व्हॅक्सीनच्या अगोदर असे औषध घेतल्यास नुकसान होऊ शकते कारण, प्रत्येक व्हॅक्सीनचा प्रत्येक व्यक्तीवर वेगळा परिणाम होतो.
एंटीइन्फ्लामेट्री औषधे इम्यून रिस्पॉन्समध्ये अडथळा आणतात आणि यामुळे अँटीबॉडी कमी प्रमाणात तयार होते. हा स्टडी जर्नल ऑफ वायरोलॉजीमध्ये प्रसिद्ध झाला आहे…
🎯 हि माहिती नक्की शेअर करा..!
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 ताज्या बातम्या, चालू घडामोडी आणि इतर माहिती व्हाट्सअॅपवर मिळवण्यासाठी लिंकवर क्लिक करून Lets Talk ला जॉईन व्हा 👉 https://bit.ly/registerletstalk
➖➖➖➖➖➖➖➖➖➖