वाहनधारकांनो ही महत्वपूर्ण बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. रस्त्यावर कोणतेही वाहन चालविण्यापूर्वी तुमच्याकडे ‘ड्रायव्हिंग लायसन्स’ (Driving licence) असणे गरजेचे असते, नाहीतर तुम्हाला मोठा आर्थिक दंड भरावा लागू शकतो.
पूर्वी ड्रायव्हिंग लायसन्स (Driving License) काढायचे म्हणजे, सर्वांसमोर मोठी संकट उभे राहत होते. यासाठी आरटीओ ऑफीसच्या हजारो चकरा माराव्या लागत होत्या. अशावेळी अनेकदा अनेक जण दलालांचीही मदत देखील घेत होते. याकडे सरकारने लक्ष देत मागील काहीवर्षांपासून ही प्रक्रिया ऑनलाईन केली. यामुळे काहीप्रमाणात जनतेचा त्रास कमी व्हायला मदत झाली. आता सरकार यात आणखी एक मोठा बदल करणार आहे. यानुसार, आता आरटीओ ऑफिसमध्ये ड्रायव्हिंग टेस्ट देण्याची गरज पडणार नाही.
आरटीओमध्ये जाऊन ड्रायव्हिंग टेस्ट देण्याची गरज नाही :
नवीन नियमानुसार, आता तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्ससाठी कोणत्याही मान्यताप्राप्त ड्रायव्हिग ट्रेनिंग स्कूलमध्ये नोंदणी करु शकतात. इथून ट्रेनिंग पूर्ण केल्यानंतर आणि एक टेस्ट पास झाल्यानंतर तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स जारी केलं जाईल. म्हणजेच तुम्हाला आरटीओमध्ये जाऊन ड्रायव्हिंग टेस्ट देण्याची गरज पडणार नाही.
काय सांगतात RTO चे नवे नियम? :
नव्या नियमांनुसार कोणत्याही ड्रायव्हिंग लायसन्ससाठी RTO त जाऊन आता टेस्ट देण्याची गरज नाही. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि परिवहन मंत्रालयाने मंजुरी दिलेले नवे नियम याच महिन्यात लागू झालेले आहेत. त्यामुळे ड्रायव्हिंग लायसन्ससाठी आरटीओच्या वेटिंग लिस्टमध्ये नाव असलेल्या देशातील कोट्यवधी लोकांना दिलासा मिळाला आहे.
ज्यांची नावं आरटीओच्या ड्रायव्हिंग टेस्टच्या यादीत आहेत त्यांना केंद्रीय मंत्रालयाने सांगितलंय की त्यांनी त्यांनी ड्रायव्हिंग लायसन्ससाठी कोणत्याही सरकारी मान्यता प्राप्त ड्रायव्हिंग ट्रेनिंग स्कूलमध्ये रजिस्ट्रेशन करावं. त्यांनी तिथंच वाहन चालवण्याचं प्रशिक्षण पण दिलं जाईल आणि तिथंच त्यांची टेस्ट घेतली जाईल. स्कूलने दिलेल्या सर्टिफिकेटच्या आधारावरच त्या व्यक्तीचं ड्रायव्हिंग लायसन्स देखील आरटीओ तयार करेल.
कसं मिळवाल घरबसल्या लायसन्स?
भारतात सध्या दोन प्रकारचे लायसन्स चा वापर होतो. एक म्हणजे शिकाऊ (लर्निंग) आणि कायमचा (परमनंट) असे दोन प्रकारचे लायसन्स देशभरात सर्वत्र वापरले जातात.
आता लर्निंग लायसन्ससाठी लोक घरबसल्या केवळ आधार कार्डच्या डिटेल्सद्वारे अप्लाय करू शकतात. यासाठी टेस्टदेखील ऑनलाईनच घेतली जाईल. आधारद्वारे त्या व्यक्तीची ओळख केली जाईल आणि घरबसल्याच लर्निंग लायसन्स मिळेल.
तर दुसरीकडे, डिलर्सला आता नॉन-ट्रान्सपोर्ट व्हिकल रजिस्ट्रेशनसाठी देखील RTO मध्ये येण्याची गरज नाही. हेदेखील आधार ऑथेंटिकेशनद्वारे आता शक्य होणार आहे.
वाहन परवाना रिन्यू करण्यासाठी काय आहे पद्धत?
– ऑनलाईन ड्रायव्हिंग परवाना रिन्यू करण्यासाठी सगळ्यात आधी भारत सरकारच्या रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाईटवर https://parivahan.gov.in/parivahan/ जा.
– इथे गेल्यावर डावीकडील ऑनलाईन पर्यायावर क्लिक करा.
– यानंतर ‘सर्विसेस ऑन ड्राइविंग लाइसेंस’ वर क्लिक करा आणि पुढील दिलेली माहिती भरा.
– अर्जामध्ये दिलेली माहिती भरून कागदपत्रंही जोडा.
– अर्ज आणि कागदपत्रं भरल्यानंतल ऑनलाईन प्रोसेस पूर्ण होते.
– यानंतर काही दिवसांत ड्रायव्हिंग परवाना तुम्ही दिलेल्या पत्त्यावर येईल.