स्वस्त धान्य दुकानदारांचं आर्थिक उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने महत्त्वाचं पाऊल उचचलं आहे.
आता रेशन धान्य दुकानात ई-सेवा केंद्र सुरू करण्यासाठी सरकारने परवानगी दिली आहे.
त्यामुळे रेशन दुकानातील ई-सेवा केंद्रात बँकेचे व्यवहार, लाइट बिल, फोन बिल, पाणी बिल, मोबाइल रिचार्ज, नवं रेशन कार्ड, आरोग्यविषयक सेवा, विमान तिकीट बुकिंग अशा अनेक सेवांचा लाभ घेता येणार आहे.
अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून याला परवानगी मिळाली असून या सेवांमुळे आता रेशन धान्य दुकानं डिजीटल होणार आहेत.
पुणे विभागात 9200 रेशन धान्य दुकानात ई-सेवा केंद्र सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. या माध्यमातून रेशन दुकानं डिजीटल होणार आहेत.
धान्य वितरणातील कमिशन पुरेसं नसल्याच्या अनेक तक्रारी दुकानदारांकडून करण्यात आल्या होत्या. त्यानंतर रेशन दुकानात ई-सेवा केंद्रांना परवानगी देण्यात आली आहे.