तुम्हाला मजेशीर वाटणारी गुगल प्ले स्टोअरवरून तुम्ही अँड्रॉइड अॅप्स डाऊनलोड केली असतील तर तुम्ही काळजी घेणं गरजेचं आहे. संशोधकांनी अँड्रॉईड अॅप्सची नवी यादी जाहीर केली आहे, जी युजर्सचा डेटा आणि पैसे चोरण्यासाठी दुर्भावनायुक्त टायटलचा वापर करत आहेत. तुमच्याही स्मार्टफोनमध्ये हे अॅप्स असतील तर ते लगेच डिलीट करा. यापैकी बहुतेक अॅप्स आधीच प्ले स्टोअरमधून अधिकृतपणे काढून टाकण्यात आले आहेत. फोनएरिनाने आपल्या अहवालात ही यादी जाहीर केली आहे.

चला या मॅलिशस  Android ॲप्सबद्दल जाणून घेऊया…

  1. Document Manager
  2. Coin track Loan – Online loan
  3. Cool Caller Screen
  4. PSD Auth Protector
  5. RGB Emoji Keyboard
  6. Camera Translator Pro
  7. Fast PDF Scanner
  8. Air Balloon Wallpaper
  9. Colorful Messenger
  10. Thug Photo Editor
  11. Anime Wallpaper
  12. Peace SMS
  13. Happy Photo Collage
  14. Original Messenger
  15. Pellet Messages
  16. Smart Keyboard
  17. Special Photo Editor
  18. 4K Wallpapers

मॅलिशस ॲप्स टाळण्याचे मार्ग 

  • अशा मॅलिशस ॲप्स आणि मालवेअरला तुमच्या Android फोनमधून नेहमी बाहेर ठेवण्याचा कोणताही सरळ मार्ग नाही. परंतु जोखीम कमी करण्यासाठी तुम्ही काही टिप्स वापरू शकता.
  • फक्त Google Play Store सारख्या विश्वसनीय स्त्रोतांकडून ॲप्स वापरून पाहा आणि डाउनलोड करा.
  • सायबरसुरक्षा तज्ञांनी सुचवलेले किंवा तुम्हाला अगदी कमी दुर्भावनायुक्त वाटतील असे सर्व ॲप्स हटवा. 
  • ॲप डाउनलोड करण्यापूर्वी कृपया ॲवरेज यूजर रेटिंग स्कोर आणि काही यूजर रिव्यू एकदा वाचा.
Share.