Ola, Hero, Ather, Okinawa देशात इलेक्ट्रिक वाहने बनवणाऱ्या कंपन्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. देशी-विदेशी कंपन्यांसह स्टार्टअप्सही यामध्ये सहभागी होत आहेत. इलेक्ट्रिक टू-व्हीलरची रचना, रेंज आणि किंमतीसह कंपन्या ग्राहकांचे लक्ष त्यांच्याकडे आकर्षित करण्यात गुंतल्या आहेत. दरम्यान, बंगळूरू स्थित इलेक्ट्रिक स्कूटर स्टार्टअप केडब्लूएच बाईक्स बाजारात दाखल झाल्या आहेत. कंपनीने सांगितय की ती देशातील ७५ डीलर्सना आपली इलेक्ट्रिक स्कूटर विकणार आहे. यासाठी त्यांना ७८,००० प्री-ऑर्डर मिळाल्या आहेत. कंपनी २०२३ पर्यंत या स्कूटरचे उत्पादन सुरू करेल. या उत्कृष्ट बुकिंगमुळे ओला, हिरो, ओकिनावा या कंपन्यांचे टेन्शन नक्कीच वाढले आहे.

१००० कोटींच्या स्कूटरचे बुकिंग झाले ?

बंगळूरू स्थित इलेक्ट्रिक वाहन स्टार्टअप कंपनी केडब्लू एच बाईक्सला त्यांची पहिली इलेक्ट्रिक स्कूटर लॉंच करण्यापूर्वी आधीच ७८,००० युनिट्सची बुकिंग प्राप्त झाली आहे. कंपनीने या वर्षी फेब्रुवारीमध्ये आपल्या आगामी इलेक्ट्रिक स्कूटरची बुकिंग सुरू केली आहे. आतापर्यंत १,००० कोटी रुपयांच्या ई-स्कूटर्सचे बुकिंग प्राप्त झाले आहे. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, इलेक्ट्रिक स्कूटर पुढील वर्षाच्या सुरुवातीच्या महिन्यात लॉंच केली जाईल.

Share.