संपूर्ण देश कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी सज्ज झाले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न प्रशासनाकडून केले जात आहेत. खबरदारीच्या सर्व उपाययोजना म्हणून योग्य ती काळजी देखील घेतली जात आहे. याच दरम्यान कोरोनाला रोखण्यासाठी, त्याला पूर्णतः नष्ट करण्यासाठी अजब-गजब उपाय देखील केले जात आहेत. अशातच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर देशातील अनेक ग्रामीण भागात किती मोठ्या प्रमाणात अंधश्रद्धा आहे हे तुम्हाला पाहायचं असेल तर उत्तर प्रदेशमधील प्रतापगडमध्ये याचं चांगलं उदाहरण समोर आलंय. या गावात अंधश्रद्धेतून थेट स्थानिकांनी कोरोना मातेचं मंदिरच उभारण्यात आलंय. तेथील स्थानिक लोक इतकंच करुन थांबले नाही तर या मंदिरात देवीच्या पुढे प्रसाद ठेऊन तिच्या नावाचा जयजयकारही सुरू आहे. याठिकाणी आता लोक गर्दीही करत असून असं केल्यानं कोरोना माता आपल्या गावावरील प्रकोप कमी करेल आणि संसर्ग कमी होईल, असा अजब दावा गावकऱ्यांनी केले आहे.
‘Corona Mata’ temple comes up under a neem tree at a village in Pratapgarh district
"Villagers collectively decided & set up the temple with belief that praying to the deity would definitely offer respite to people from Coronavirus," a villager said yesterday. pic.twitter.com/jA3SGU0RQE
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) June 12, 2021
या कोरोना मातेच्या मंदिराची बातमी सोशल मीडियावर टाकतच देशभरातून अनेक ठिकाणावरून यावर प्रतिक्रिया उमटत आहेत. सोशल मीडियावरून अनेक लोक यावर टोलेबाजी करत आहेत. प्रतापगडमधील एका गावात गावकऱ्यांनी एका लिंबाच्या झाडाखाली छोटंसं कोरोना मातेचं मंदिर बनवलं. त्यानंतर याची देशभरात चर्चा झाली आणि लोक मोठ्या संख्येने येथे येण्यास सुरुवात झाली. लोक येथे येऊन या देवीची पूजाही करत आहेत.
मंदिर तयार करण्यामागे गावकऱ्यांचं म्हणणं काय?
मंदिर उभारणाऱ्या गावकऱ्यांच्या मते, कोरोना मातेची पूजा केल्यास गावात कोरोना संसर्ग होणार नाही. यामुळे नक्कीच लोकांचं कोरोनापासून संरक्षण होईल. विशेष म्हणजे गावकऱ्यांनी मंदिर उभं केल्यानंतर देवीला मास्क घातलाय आणि मंदिराच्या भिंतीवर दोन्ही बाजूला अंतर राखा आणि दूरवरुनच दर्शन घेण्याची सूचना लिहिली आहे. तसेच मास्क घालण्यास सांगण्यात आले आहे.
अंधश्रद्धा आणि अपप्रचाराचे बळी
गावातील लोक या साथीरोगाला देवीचा प्रकोप मानत आहेत. लोकांमध्ये योग्य माहितीचा आणि शिक्षणाचा अभाव हे या अंधश्रद्धेमागील मुख्य कारण असल्याचं दिसतंय. त्यातूनच त्यांनी कोरोनापासून संरक्षणासाठी वैज्ञानिक उपाययोजना करण्याऐवजी कोरोना मातेचं मंदिर उभं करुन कर्मकांड करणं सुरू केलंय. इतकंच नाही कोरोना संसर्गाला खुलं आमंत्रण देणाऱ्या गोष्टीही होत आहेत. अनेक लोक येथे गर्दी करत आहेत. त्यामुळे कोरोनापासून संरक्षण होण्याऐवजी कोरोना संसर्गाचा धोका वाढणार असल्याचंच एकूण चित्र आहे.