ठाकरे सरकारचा खाजगी दवाखान्यांना दणका; कोविड उपचारासाठी नवे दर जारी!
कोरोनाग्रस्त वाढत असताना खाजगी रुग्णालयांची चांगलीच चांदी होत होती, रुग्णांचे आर्थिक शोषण थांबावे म्हणून सरकारने 80% खाटांचे दर सरकारच्या निकषांवर तर बाकी 20% खाजगी दवाखान्यांच्या निकषांवर ठेवायची परवानगी दवाखान्यांना दिली.
खाजगी रुग्णालयात कोविडबाधित रुग्णांवर उपचारासाठी 80 टक्के खाटांसाठी शासनाने निश्चित केलेल्या दरानुसार व उर्वरित 20 टक्के खाटांसाठी खाजगी रुग्णालयांनी निश्चित केलेल्या दरानुसार दर आकारणी करण्याबाबतची अधिसूचना काल संपली. आज त्यास मुदतवाढ देताना त्यात शहरांच्या वर्गीकरणानुसार सुधारणा करण्यात आली आहे.
नवे दर पुढीलप्रमाणे:
वॉर्डमधील नियमित विलगीकरण (प्रति दिवस)
‘अ’ वर्ग शहरांसाठी 4 हजार रुपये
‘ब’ वर्ग शहरांसाठी 3 हजार रुपये
‘क’ वर्ग शहरांसाठी 2400 रुपये
(आवश्यक देखरेख, नर्सिंग, चाचण्या, औषधी, बेड्सचा खर्च व जेवणाचा समावेश आहे. मोठ्या चाचण्या, तपासणी, उच्च पातळीवरील मोठी औषधी यातून वगळली आहेत.
व्हेंटीलेटरसह आयसीयू व विलगीकरण
‘अ’ वर्ग शहरांसाठी 9000 रुपये,
‘ब’ वर्ग शहरांसाठी 6700 रुपये
‘क’ वर्ग शहरांसाठी 5400 रुपयेकेवळ आयसीयू व विलगीकरण:
‘अ’ वर्ग 7500 रुपये
‘ब’ वर्ग 5500 रुपये
‘क’ वर्ग 4500 रुपये
‘अ’ वर्गातील शहरे
मुंबई, महानगर क्षेत्र (भिवंडी, वसई-विरार वगळून), पुणे, पुणे महानगर क्षेत्र, नागपूर (नागपूर मनपा, दिगडोह, वाडी).
‘ब’ वर्ग शहरे
नाशिक, औरंगाबाद, अमरावती, भिवंडी, सोलापूर, कोल्हापूर, वसई-विरार, मालेगाव, नांदेड, सांगली
‘अ’ आणि ‘ब’ वर्ग शहरे सोडून इतर सर्व जिल्हा मुख्यालयांचा ‘क’ वर्गात समावेश केला आहे.