इन्कम टॅक्स हा प्रत्येक करदात्या साठी महत्वपूर्ण तर कधीकधी धडकी भरवणारा विषय असू शकतो. इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करण्याची विशिष्ट मुदत दिलेली असते. त्या मुदतीमध्ये तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करू शकता.
विशिष्ट एका रकमेपर्यंत तुमचे जर वार्षिक उत्पन्न असेल तर तुम्ही इन्कम टॅक्स भरण्यासाठी पात्र असता, हे प्रत्येकाला माहीत आहे. टॅक्स न भरल्याने होणारे परिणाम देखील सगळे जण जाणून असतात.
इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करण्याची तुम्ही तयारी करत असाल तर, सहा दिवस तुम्ही तसे करू शकणार नाही. 1 जून ते 6 जून या सहा दिवसांसाठी इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करणे अशक्य होणार आहे.
इन्कम टॅक्स रिटर्न ची ऑफिशिअल वेबसाईट 1 जून ते 6 जून या सहा दिवसांसाठी बंद राहणार असून, इन्कम टॅक्स संबंधित कोणतीही कामे तुम्ही सहा जून नंतरच करू शकाल.
मागच्या महिन्यामध्ये इन्कम टॅक्स अधिकाऱ्यांनी याबाबतची माहिती दिली होती. इन्कम टॅक्स संबंधी आयटीआर दाखल करणे, इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करणे किंवा अन्य कोणतेही काम 1 ते 6 जून या दरम्यान तुम्ही करू शकणार नाही, अशी सूचना मागच्या महिन्यामध्ये सर्वसामान्य जनतेसाठी देण्यात आली होती.