देशात कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातल्यानंतर आता काही प्रमाणात कोव्हिडची साथ नियंत्रणात आल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. गेल्या 24 तासांमध्ये देशभरात फक्त 86,498 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, कोरोनाची दुसरी लाटेच्या सुरवातीला देशात प्रत्येकदिवशी हा आकडा चार लाखांच्या आसपास होता.
मात्र, आता हे प्रमाण एक लाखापेक्षा कमी असे तरी आता कोरोनाबाबत एक धक्कादायक माहिती समोर आले आहे. आता कोरोना व्हायरसची नवीन लक्षणे दिसू लागली आहे. कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेत बहिरेपणा, रक्ताच्या गाठी तयार होणे त्याचं रूपांतर गॅंगरीनमध्ये होणे अशी लक्षणे कोरोना रूग्णांमध्ये कधीच आढळून आली नव्हती. मात्र आता असचं काहीसे नवे लक्षण भारतात कथित डेल्टा व्हेरिएंटसोबत डॉक्टर जोडत आहेत.
डेल्टा ज्याल B.1.617.2 च्या नावाने ओळखला जाणारा कोरोना स्टोन याने गेल्या सहा महिन्यात साधारण 60 देशात थैमान घातलं आहे. या डेल्टा व्हेरिएंटमध्ये इतर व्हेरिएंटच्या तुलनेत संक्रमणाची तीव्रता अधिक आहे. तसेच वॅक्सीनचा प्रभाव न होणे अशाही समस्या या व्हेरिएंटमुळे पुढे येत आहे.
अपोलो हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या माहितीनुसार, महामारीच्या पहिल्या लाटेच्या तुलनेत यावेळी डायरियाचे सर्वात जास्त रूग्ण बघायला मिळत आहेत. गेल्यावर्षी सर्वाना वाटलं होतं की, आपण व्हायरस ला चांगल्या प्रकारे जाणतो. पण आता याच चुकीमुळे नव्या रूपाने भारताला हैराण केलं आहे.
कोरोना बाधित रुग्णांनामध्ये आता सर्वातजास्त पोटदुखी, जांबई येणे, उलटी, भूक कमी लागणे, बहिरेपणा, सांधेदुखीसारखी लक्षणे बघायला मिळत आहेत. एवढेच नाही तर डॉक्टर म्हणाले की, यावेळी काही रूग्णांमध्ये मायक्रो थ्रोंबी आणि छोट्या रक्ताच्या गाठी देखील आढळून येत आहेत. ज्या पुढे जाऊन गॅंगरीनमध्ये बदलत आहेत.
दरम्यान, कोरोना स्टोन डेल्टा व्हेरिएंटने भारतात आपलं भयानक रूप दाखवलं आहे आणि दाखवत आहे. सध्या भारतात सर्वात मोठी चिंतेची बाब आहे हा व्हेरिएंट वेगाने पसरण्याची आणि याचा लहान मुलांवर प्रभाव बघायला मिळत आहे.