🗓️ रविवार 11 एप्रिल 2021
मेष : मोठ्या लोकांमध्ये उठबस वाढेल. जवळचे मित्र भेटतील. उष्णतेच्या विकारांचा त्रास जाणवेल. कामाची धावपळ वाढेल. मुलांच्या आरोग्याची काळजी घ्यावी.
वृषभ : बोलण्यातून कामे मिळवाल. इतरांची मने जिंकून घेता येतील. सजावटीच्या वस्तू खरेदी कराल. कलागुणांना चांगला वाव मिळेल. व्यापारी वर्गाला दिवस चांगला जाईल.
मिथुन : कफविकाराचा त्रास जाणवू शकतो. लहान प्रवास कराल. बाहेरील अन्नपदार्थ टाळावेत. मनाची विशालता दाखवाल. धार्मिक भावना जोपासाल.
[sc name=”adg”]
कर्क : आवडते पदार्थ चाखाल. कौटुंबिक गोष्टी सुरळीत पार पडतील. जोडीदाराबरोबर गप्पा-गोष्टी कराल. पैज जिंकता येईल. कलेला पोषक वातावरण मिळेल.
सिंह : मानसिक व्यग्रता जाणवेल. आपला ठसा उमटवाल. घरातील गोष्टी शांततेत हाताळाव्यात. वाहन विषयक कामे पार पडतील. जमिनीच्या कामात लक्ष घालाल.
कन्या : फार काळजी करू नये. काही गोष्टी पूर्ण होण्यास पुरेसा वेळ द्यावा. ऐशोरामाच्या वस्तूंची आवड निर्माण होईल. व्यसनाच्या आहारी जाऊ नये. सामाजिक बांधिलकी जपाल.
[sc name=”adg”]
तूळ : मनातील इच्छा पूर्ण होईल. जवळच्या मित्रमंडळींशी गप्पांमध्ये रमून जाल. नवीन स्नेहसंबंध जोडले जातील. तिखट पदार्थ खाण्याची हौस भागवाल. आत्मविश्वास वाढीस लागेल.
वृश्चिक : प्रत्येक गोष्टीत समाधान मानाल. घरातील वातावरण प्रसन्न ठेवाल. आनंदाने एकमेकांना मदत कराल. घरात टापटीप ठेवाल. उत्तम वाहन सौख्य लाभेल.
धनु: कौटुंबिक जबाबदारी वाढेल. गोड बोलून कामे मिळवाल. दुसऱ्यांच्या आनंदात सहभागी व्हाल. निसर्गाच्या सानिध्यात रमून जाल. फोटोग्राफीची हौस पूर्ण करता येईल.
[sc name=”adg”]
मकर : श्रम वाढतील. आपले विचार उत्कृष्ठपणे मांडाल. हसत हसत कामे पूर्ण कराल. बौद्धिक चलाखी वापराल. योग्य तर्क वापराल.
कुंभ : झोपेची तक्रार जाणवेल. सामाजिक गोष्टीत लक्ष घालाल. मानापमानाच्या गोष्टी फार मनावर घेऊ नयेत. आर्थिक गुंतवणूक सावधगिरीने करावी. काही कामे अडकून पडतील.
मीन : लहानांशी मैत्री कराल. मानाने कामे कराल. चांगला आर्थिक लाभ होईल. सामाजिक कार्यात पुढाकार घ्याल. योग्य कागदपत्रे सादर करावीत.
[sc name=”adg”]