कोरोनाने अनेकांने बेरोजगार बनवले. त्यामुळे सध्या छोटे-मोठे स्वतःचे उद्योग करण्याकडे कल दिसत आहेत. त्यातल्या स्रियांना घरच्या कामातून सवड काढून काहीतरी काम मिळावे अशी अपेक्षा असते. पूर्वीच्या काळात स्त्रिया फक्त घरातील कामे हाताळत असत परंतु आता त्यांना त्यांच्या आयुष्याविषयी अधिकाधिक जाणीव होत आहे.
जेव्हा ते विविध क्षेत्रांतून व्यवसाय चालवतात आणि विकसित करतात तेव्हा ते पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून चालत असतात. बर्याच स्त्रिया आहेत जे एका हाताने घर सांभाळतात आणि दुसर्या हाताने आपला व्यवसाय / कार्यालयीन काम करतात. खास अशा महिलांसाठी आम्ही सात व्यवसायाच्या आयडिया घेऊन आलो आहोत. ज्याद्वारे तुम्हाला आर्थिक स्थैर्य मिळू शकते. हाच हेतू ठेवून आजच्या या लेखामध्ये आपण काही असे उद्योग पाहणार आहोत, जे घर बसल्या करून तुम्ही हजारो रुपये कमवू शकता!
नेमके घरबसल्या करावयाचे बिजनेस कोणते?
ऑनलाईन क्लास
जी कला तुम्हाला अवगत आहे ती इतरांनाही यावी आणि त्यातून कमाई ही बाब अशी तुमची इच्छा असेल तर, ऑनलाईन क्लास ही गोष्ट तुमच्या साठी उपयुक्त आहे. ऑनलाईन क्लास कोणत्याही गोष्टीचा घेऊ शकता. डान्स, कुकिंग, किंवा इतरही!
ब्लॉग मधून कमाई
लेखक म्हणून विविध विषयांवर लिहायची आवड असेल तर, एखादा विषय निवडून त्यावर ब्लॉग लिहिण्याची सवय तुम्हाला पैसे कमवून देऊ शकते. उदाहरणार्थ एखाद्याला पाककला कुशल आपण आहोत असे वाटत असेल तर त्याविषयीचे ब्लॉग लिहून तुम्ही पैसे कमवू शकता यामध्ये येणाऱ्या विविध जाहिराती किंवा तुमच्या ब्लॉगचे डिजिटल मार्केटिंग करून लाखो रुपये तुम्ही कमवू शकता.
फ्रिलांस रायटिंग
ज्यांना लेखनाची आवड आहे, असे लोक फ्रीलान्स रायटिंग करून पैसे कमवू शकतात. फ्रीलान्स रायटिंग करताना तुम्ही एखाद्या कंपनीसाठी किंवा एखाद्या उद्योगासाठी लेख, जाहिराती, अनुवाद, भाषांतर अशा पद्धतीने लेखकाची भूमिका निभावू शकता आणि त्यातून पैसे कमवू शकता.
युट्युब चॅनेल सुरू करणे
यूट्यूब चैनल वर विविध प्रकारे कन्टेन्ट टाकून अनेक जण लाख रुपये कमावतात. याची योग्य ती लक्षात आली तर, विविध प्रकारे उपयुक्त माहिती यूट्यूब चैनल वर टाकून ते यूट्यूब चैनल व्यवस्थित प्रमोट करून देखील अनेक कंटेंट क्रियेटर पैसे सध्या कमवत आहेत. या साधनाचा विचार करून तुम्ही घरबसल्या पैसे कमवू शकता.
ब्रेड बनवणे
कोरोना च्या काळामध्ये बाहेरचे अन्न खाणे तसेच वर्ज झाले आहे. त्यामुळे अनेक जणांनी लोकांमध्ये ब्रेड देखील खाल्लेला नाही. ब्रेड बनवणे ही प्रक्रिया अवघड वाटत असली तरी ती घरी देखील होऊ शकते. तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये घरात ब्रेड बनवून बाहेर विकू शकता आणि त्याद्वारे कमाई करू शकता.
फॅशन डिझाइनर :
हल्ली फॅशनेबल कपड्यांची क्रेझ तरुण-तरुणींमध्ये वाढत चाललीय. याचं ज्ञान असणाऱ्या गृहिणींना या बिझनेसमध्ये चांगली कमाईची संधी आहे. या क्षेत्राशी संबधीत शॉर्ट टर्म कोर्स करून तुम्ही काम सुरू करू शकता.
योग ट्रेनर :
आज, योग उद्योग देखील बरीच प्रगती करीत आहे आणि बर्याच स्त्रिया आपल्या दैनंदिन जीवनासाठी तसेच शारीरिक आरोग्यासाठी वेळ घालवण्याची काळजी घेत आहेत. जगभरात साथीचे रोग पसरत असताना, बहुतेक लोकांसाठी एक ऑनलाइन योग वर्ग हा एक उत्तम पर्याय आहे.