प्रेमाचा आठवडा म्हणजेच व्हॅलेंटाईन वीक काल पासून सुरु झाला आहे. तर आज या आठ्वड्यातील सर्वात खास दिवस म्हणजेच प्रपोज डे प्रेमीयुगुलांकडून साजरा केला जातो. प्रेम करणे सोपे वाटत असले तरी प्रपोज करणे खुप अवघड काम असते.
प्रपोजल म्हटलं मग ते कुठलंही असो… पोटात गोळाच येतो. या प्रपोजलनंतर एक तर कमालीचा आनंद होतो नाहीतर थोडे दु:खं. कारण हे प्रपोजल मान्यही व्हावं लागतं.
प्रपोज करण्याच्या काही खास टीप्स
प्रेमपत्र
प्रेमपत्राची पद्धत तशी खूप जुनीच. पण तुमच्या भावना नीडरपणे, काहीही हातचं राखून न ठेवता समोर ठेवायच्या असतील तर प्रेमपत्राशिवाय पर्याय नाही. फक्त ते लिहिल्यावर चुकीच्या हातात जाणार नाही याची मात्र काळजी सर्वानी घ्या बरं का..
लॉंगड्राईव्ह
आपल्या आवडत्या व्यक्तीला वेळात वेळ काढून लॉंगड्राईव्हवर घेऊन जा आणि शांत रोमँटिक वातावरणात तिचा हातात हात धरून प्रपोज करा. आपल्या मनातला सर्व विचार प्रामाणिकपणे तिच्यासमोर मांडा.
रोमँटिक कविता
शब्दांशी खेळण्याची कला तुम्हाला अवगत असेल हवी, कविता करायची आवड असेल तर तिच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे सांगणारी एखादी कविता करा.
अंगठी
पाश्चात्य देशात प्रपोज करण्याचं माध्यम म्हणजे अंगठी. आपल्याकडे मात्र अंगठीची देवाणघेवाण थेट साखरपुड्यातच होते. पण प्रपोज डे रोमँटिक करायचा असेल तर एक छोटी गंमत म्हणून मोगऱ्याच्या फुलांची अंगठी तयार करुन तिच्या हातात घाला… पाहा तिच्या चेहऱ्यावरचं हास्य कसं मोगऱ्याप्रमाणे फुलेल….
अशाप्रकारे केलेलं प्रपोज तरुणींना नक्की आवडतं
▪️ एखादा मुलाला मुलीशी लग्न करायचे असल्यास, त्याने एकांत ठिकाणी तिला प्रपोज करावं, असं प्रत्येक तरुणींना वाटत असते.
▪️ तसेच त्याने तिला अशा ठिकाणी प्रपोज करावे, ज्यामुळे त्याची प्रेयसीला सदैव आठवणीत राहिल अशा ठिकाणी करावं.
▪️ प्रेयसीला लग्नाची मागणी घालताना तिला अश्चर्याचा सुखद धक्का बसावा याची काळजी करावी
▪️ प्रपोज करण्यापूर्वी प्रियकराने स्वत:च अंगठीची निवड करण्यात यावी.
▪️ प्रियकरांने प्रपोज करण्यासाठी साधारण 2 ते 3 महिने पूर्वी नियोजन करावे.
▪️ लग्नासाठी मागणी घालताना प्रियकराने गुडघ्यावर बसून प्रपोज करणे कधीह चांगले, तसेच डेटिंग दरम्यान लग्नाच्या विषयावर पुष्कळ चर्चा करावी
▪️ 19 टक्के तरुणींना आपला प्रियकर प्रपोज करताना थोडा दु: खी असावा वाटतं.
▪️ तर 10 टक्के तरुणींना त्यांचा प्रियकर प्रपोज करताना गाण म्हणून प्रपोज करावं असं वाटत असतं.
▪️ तसेच 7 टक्के तरुणींना त्यांच्या प्रियकराने तिच्यावर कविता करावी असं वाटत असतं.