गुलाब – ही प्रेमाची खरी अभिव्यक्ती म्हणून ओळखले जातात. कारण ते प्रेम आणि प्रणयरम्य परिभाषित करतात. हे आपल्या प्रियजनांना “मी तुझ्यावर प्रेम करतो” किंवा “तू माझी हो” सारखे रोमँटिक अर्थ सांगते. त्यामुळे आपल्या आवडत्या व्यक्तीबद्दल आपल्या मनातील भावना गुलाबाच्या रुपात व्यक्त करायचा हा दिवस आहे.
फेब्रुवारीचा महिन्यचा अर्थ प्रेमात पडलेल्या आणि प्रेमात पडायच्या मार्गावर असलेल्यांसाठी विशेष असा असतो. व्हॅलेंटाईनची वीकची सुरुवात झाली असून तो जगभरातील तरुणांकडून उत्साहाने साजरा केला जातो. तसं पहायला गेलं तर व्हॅलेंटाईन वीक किंवा हे वेगवेगळे डे हे पाश्चात्य संस्कृतीचे लक्षण.
भारतात प्राचीन काळापासून, अगदी राजा-महाराजांपासून प्रेम व्यक्त करण्यासाठी गुलाबाचा वापर करण्यात येतोय. आपल्या मनातील भावना शब्दात व्यक्त करता येत नसतील तरीही आपल्या आवडत्या व्यक्तीला केवळ गुलाब दिलं तरी भावना पोहचतात.
लाल गुलाब; प्रेमाचं प्रतिक
सर्वच जण लाल गुलाबाला प्रेमाचं प्रतिक मानतात. आपल्या मनातील प्रेम व्यक्त करताना लाल गुलाबाचा वापर सर्वत्र केला जातो. प्रेमी युगुलांच्या जीवनात लाल गुलाबाला मोठं महत्व असतं. त्यामुळे पहिल्यांदाच आपल्या प्रेमाची भावना व्यक्त करताना लाल गुलाबाचा वापर केला जातो.
पांढरे गुलाब; निस्वार्थी प्रेमाचं प्रतिक
पांढरा रंग हा तसा शांततेचं प्रतिक समजले जाऊ शकते. त्यामधून पवित्रता आणि शांतीची भावना व्यक्त होते. जर तुम्ही कोणावर शुद्ध आणि निस्वार्थी प्रेम करत असाल तर त्या व्यक्तीला पांढरे गुलाब देऊ शकता. आपल्या नात्यातील प्रेम दर्शवण्यासाठी या गुलाबांचा वापर केला जातो. कोणत्याही नात्याची सुरुवात करताना या रंगाचे गुलाब देण्यात येतात. महत्वाचं म्हणजे नात्याची शेवट करतानाही याच रंगाचे गुलाब देण्यात येतात.
गुलाबी गुलाब; प्रेरणेचे प्रतिक
गुलाबी रंग हा प्रेरणा किंवा प्रोत्साहनाचा रंग मानला जातो. तसेच आपल्याला कोणी आवडत असेल तर त्याची कबुली या गुलाबी गुलाबातून दिली जाऊ शकते. आपण कोणाकडून प्रेरित झाला असाल किंवा कोणाला आपला आदर्श मानत असाल तर त्याच्याप्रती आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी गुलाबी रंगाचे गुलाब देऊ शकता.
केशरी गुलाब; त्यागाचं प्रतिक
केशरी रंग त्यागाचे आणि वीरतेचे प्रतिक मानले जाते. जर तुम्ही कोणावर जीवापाड प्रेम करत असाल किंवा त्याच्या प्रती समर्पणाची भावना असेल तर त्या व्यक्तीला केशरी रंगाचे गुलाब देऊ शकता. या रंगाचे गुलाब दुर्मीळ आहे. तसंही या रंगाप्रमाणे खरे प्रेमही दुर्मीळ असल्याचं दिसतंय.
पिवळे गुलाब; मैत्रीचे प्रतिक
पिवळा रंग मैत्रीचे लक्षण आहे. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात कोणी ना कोणी खास मित्र असतात, ज्यांच्यासाठी आपण काहीही करु शकतो. जर तुमच्यातील मित्रत्वाचे संबंध समुद्राप्रमाणे अथांग असतील तर अशा व्यक्तीला तुम्ही पिवळे गुलाब देऊ शकता आणि आपल्या मैत्रिची भावना व्यक्त करु शकता.
लव्हेंडर गुलाब; वैभवचे प्रतीक
पहिल्या दृष्टीक्षेपात प्रेमाची भावना लव्हेंडर कलरद्वारे व्यक्त केली जाते. हे गुलाब वैभव आणि वैभवाच्या भावनासह आदर आणि कल्पनारम्य असल्याचे दर्शवितात.