हल्लीच्या तरुण-तरुणांच्या मैत्रीतील गोडवा अर्थात दुवा म्हणजेही चॉकलेट आणि ‘त्या’ प्रेमाला आधारही देखील असतो तो चॉकलेटचा गोडवाच. असा हा स्वीट, गोड, मधूर. ‘व्हॅलेंटाइन वीक’चे जोरदार सेलिब्रेशन सुरू असल्यामुळे सध्या सर्वांवर प्रेमाचा रंग दिसत आहे. प्रत्येकाला हव्याहव्याशा वाटणाऱ्या चॉकलेट्सला आज साजऱ्या होणाऱ्या ‘चॉकलेटची डे’बद्दल कमालीची उत्सुकता आहे.
आवडत्या व्यक्तीला चॉकलेट देऊन त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर मोहक हास्य फुलविणारा दिवस म्हणजे ‘चॉकलेट डे’! कुठल्याही शुभकार्याची सुरुवात हि नेहमी गोडाने होते आणि प्रेमाची सुरुवात हि चॉकलेटने. तशी ही स्टाईल म्हणजे फॅन्टसीच. स्वप्न्यात प्रेमात मोठे स्थान असते आणि म्हणूनच ‘चंद्र-तारे तोडण्या’ची भाषा प्रेमात केली जाते आणि ही भाषा म्हणजे सहृदय भावना असते.
मग अनेकदा चॉकलेटने दुरावा दूर होतो अन् प्रेमात गोडवा निर्माण होतो, हे नाकारता येणार नाही. प्रत्येक प्रेम म्हणजे तिचे / त्याचे असेल असे नाही कधी तरी ते मैत्रीचेही असू शकते, बहीण-भावाचेही असू शकते अन् आई-वडिलांचेही.
आठवत असेल तर लहानपणी बाबांनी रागावले, किंवा कधी तरी नकळत मारले की नंतर त्यावर विरजण म्हणून हाती पडत होते ते पहिले चॉकलेट. चेहऱ्यावर कसे हसू फुलत होते आणि मनातील राग देखील लगीच शांत होत होता. ते दिवस आठवले की चॉकलेटच्या गोडव्यात रमायला होते.
आपण भारतीय उत्सवप्रिय आहोत आणि ज्यात आनंद मिळेल त्याचे अनुकरणप्रियही देखील आहोत. पाश्चिमात्य देशात तरुणांमध्ये प्रचंड लोकप्रिय असलेला ‘व्हॅलेंटाईन डे’ आपण आपल्या संस्कृतीमध्ये रुजवून घेतला आणि त्या रंगात प्रेमाच्या बागा फुलायलाही लागल्या.
‘व्हॅलेंटाईन वीक’ साजरा करायचा तर प्रत्येक दिवसाचे वैशिष्ट्यही हवेतच ना! म्हणून मग पहिला दिवस ‘रोज डे’ म्हणून साजरा होतो, म्हणजे गुलाब रोपटे रोजच उमलत असले तरी या दिवसाचे महत्त्व वेगळंच. आता गुलाब दिले म्हणालेकी प्रपोज करावेच लागतो म्हणून दुसरा दिवस ‘प्रपोज डे’. प्रपोज केल्यावर नकार-होकारामध्ये फसलेल्या प्रेयसीला आणखी जवळीक देता यावी म्हणून काही गोडवा हवा आणि म्हणून साजरा व्हायला लागला हा ‘चॉकलेट डे’.
सध्या कोरोना महामारीमुळे व सोशल मीडियाचा वापर वाढल्यामुळे व्हॅलेंटाइन वीक हे ‘व्हर्च्युअल’ सेलिब्रेशनही होताना दिसते. शिवाय, आपल्या मित्र-मैत्रिणींनी दिलेले गिफ्ट्स, चॉकलेट्सचे फोटोस काढूनही व्हॉट्सअॅप आणि फेसबुकवरही स्टेटस स्वरूपात देखील अपलोड होते, या मुळे नेटीझन्सची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे.
एका हृदयाचे दुसऱ्या हृदयाशी मिलन व्हावे याकरीता कदाचीत चॉकलेट डेला महत्व प्राप्त झालं असेल. चॉकलेट सेलिब्रेशन वेगवेगळ्या पद्धतीने करता येतं याकरीता नियोजन नक्की करा आणि साजरा करा आठवणीत राहिल असा यंदाचा स्पेशल चॉकलेट डे.