14 फेब्रुवारी महत्वाच्या घटना
14 फेब्रुवारी 1876 : अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल व एलिशा ग्रे यांनी एकाच दिवशी टेलिफोनच्या पेटंटसाठी अर्ज केला.
14 फेब्रुवारी 1881 : भारतातील पहिल्या होमिओपाथिक कॉलेजची कोलकाता येथे स्थापना.
14 फेब्रुवारी 1899 : अमेरिकेत निवडणुकांसाठी मतदान यंत्रे वापरण्यास सुरूवात झाली.
14 फेब्रुवारी जन्म / जयंती / वाढदिवस
14 फेब्रुवारी 1483 : पहिला मुघल सम्राट, हिंदुस्तानातील मुघल सत्तेचा संस्थापक बाबर यांचा जन्म. (मृत्यू: 26 डिसेंबर 1530)
14 फेब्रुवारी 1914 : ऊर्दू शायर व गीतकार जान निसार अख्तर यांचा जन्म. (मृत्यू: 9 ऑगस्ट 1976)
14 फेब्रुवारी 1916: कवयित्री संजीवनी मराठे यांचा जन्म.
14 फेब्रुवारी मृत्यू / स्मृतिदिन / पुण्यतिथी
14 फेब्रुवारी 1405 : मंगोलियाचा राजा तैमूरलंग यांचे निधन. (जन्म: 8 एप्रिल 1336)
14 फेब्रुवारी 1974 : आग्रा घराण्याचे गायक, शास्त्रीय संगीताचे गाढे अभ्यासक व संगीत गुरू श्रीकृष्ण नारायण रातंजनकर यांचे निधन. (जन्म: 1 जानेवारी 1900)