कोरोनावरील लस घेणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता तुम्ही व्हॉट्सऍपद्वारे लसीचे स्लॉट बुक करू शकता आणि तुमच्या जवळच्या लसीकरण केंद्राची माहिती मिळवू शकता. व्हॉट्सऍपचे नवीन फिचर मायगोव्ह (MyGov) कोरोना हेल्पडेस्कसह काम करेल. काही दिवसांपूर्वी व्हॉट्सऍपवर लसीकरणाचे प्रमाणपत्र डाउनलोड करण्याची सुविधा उपलब्ध झाली होती. त्यानंतर आतापर्यंत सुमारे 32 लाख प्रमाणपत्रे डाउनलोड केली गेली आहेत.
अनेक भारतीय आता मोबाईलवर WhatsApp चा वापर करत आहेत. तसेच CoWin पोर्टलचाही https://www.cowin.gov.in वापर करुन लोक सध्या लसीकरणासाठी नोंदणी करतात. पण,आता तुम्हाला लसीकरणासाठी नोंदणी ही व्हॉट्सअपच्या माध्यमातूनही करता येणार आहे.
व्हॉट्सऍपद्वारे लसीचे स्लॉट कसे बुक करावे?
▪️ सर्वप्रथम तुमचा फोन MyGov Corona Helpdesk Chatbot वर +91-9013151515 हा नंबर सेव्ह करावा लागेल.
▪️ आता WhatsApp उघडा आणि मायगोव्ह करोना हेल्पडेस्क संपर्क उघडा.
▪️ आता बुक स्लॉट लिहून मेसेज करा.
▪️ यानंतर, तुमच्या मोबाइल क्रमांकावर सहा अंकी ओटीपी येईल.
▪️ यानंतर, तुम्हाला लसीकरण केंद्राचे स्थान, तारीख आणि नाव निवडण्याचा पर्याय मिळेल.
▪️ यानंतर, तुमच्या पिन कोडनुसार, तुमचे जवळच्या लसीकरण केंद्रावर लसीसाठी स्लॉट बुक केले जाईल.
व्हॉट्सऍपवर लस प्रमाणपत्र कसे डाउनलोड करावे?
▪️ सर्वप्रथम तुमच्या मोबाईलमध्ये +91-9013151515 सेव्ह करा.
▪️ त्यानंतर व्हॉट्सऍप उघडा.
▪️ या क्रमांकावर ‘COVID प्रमाणपत्र’ किंवा ‘प्रमाणपत्र डाउनलोड करा’ टाईप करून पाठवा.
▪️ आता तुमच्या क्रमांकावर 6 अंकी OTP येईल.
▪️ आता चॅट मध्ये OTP पाठवा.
▪️ आता कोविन पोर्टलवर नोंदणी केलेल्या सर्व सदस्यांची यादी त्या मोबाईल नंबरवरून दाखवली जाईल.
▪️ आता कोणाचे प्रमाणपत्र डाउनलोड करायचे आहे त्याचा अनुक्रमांक पाठवा.
▪️ तुम्ही संदेश पाठवताच तुम्हाला लसीकरणाचे प्रमाणपत्र पीडीएफ स्वरूपात मिळेल.
व्हॉट्सऍप व्यतिरिक्त, कोविन पोर्टलवरूनदेखील तुम्ही प्रमाणपत्र डाउनलोड करू शकता. तुम्हाला कोविन पोर्टलवर नोंदणीकृत मोबाईल नंबरद्वारे लॉगिन करावे लागेल. त्यानंतर प्रमाणपत्र डाउनलोड करता येईल. हे व्हॉट्सऍप चॅटबॉट गेल्या वर्षीपासून कोरोनाचे अपडेट देण्यासाठी आणि कोरोनाशी संबंधित लोकांच्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी वापरत आहे.