best smart phone offers :जुन्या फोनचे (Phone) तुम्ही काय कराल? असा प्रश्न विचारला की फेकून देऊ किंवा पडलेला राहू देऊ, असं उत्तर येईल. पण आता तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की बंद झालेल्या स्मार्टफोनवर तुम्हाला 2 हजार रुपये सूट मिळू शकते. होय, हे स्वप्न नसून वास्तव आहे. रिलायन्स जिओने (Jio) आपल्या JioPhone Next साठी एक मनोरंजक ऑफर (Offer) आणली आहे. ऑक्टोबर 2021 मध्ये लाँच झालेला JioPhone Next स्मार्टफोन भारतात 6 हजार 499 रुपयांना विकला जात आहे. कंपनीने या डिवाइससाठी आधीच अनेक ऑफर्स आणि EMI प्लॅन आणले आहेत. कंपनी आता सर्वात रोमांचक ऑफर घेऊन आली आहे. यापूर्वी असे सांगण्यात आले होते की Jio कोणत्याही कार्यरत स्मार्टफोनची देवाणघेवाण करण्यावर 2 हजार रुपयांची सूट देत आहे.
JioPhone Next ची किंमत 4 हजार 499 रु.
आता हे निश्चित झाले आहे की कंपनीचे एक्सचेंज केवळ कार्यरत स्मार्टफोनवरच नाही तर बंद झालेल्या स्मार्टफोनवर देखील लागू आहे. एका Jio किरकोळ विक्रेत्याने 91mobiles ला पुष्टी केली आहे की 2 हजार रुपयांची एक्सचेंज ऑफर कार्यरत स्थितीत नसलेल्या स्मार्टफोनवर देखील लागू आहे. चला नवीन ऑफरबद्दल बोलूया….
तुमच्या घरात मृत स्मार्टफोन पडून असण्याची शक्यता जास्त असते. त्याचे काय करावे हे तुम्हाला माहीत नसते. पण, आता तुम्हाला त्या स्मार्टफोनसाठी 2 हजार रुपये मिळतील, कसे? असं तुम्ही लगेच म्हणाल. तर ऐका, नवीन JioPhone Next ऑफर तुम्हाला तुमचा फोन 2 हजार रुपयांच्या किंमतीला एक्सचेंज करण्याची परवानगी देते. मग ते काम करत असो वा नसो. यामुळे भारतातील JioPhone Next स्मार्टफोनची एकूण प्रभावी किंमत 4 हजार 499 रुपये होईल. कंपनीच्या धोरणानुसार नॉन-वर्किंग स्मार्टफोनसह 2 हजार रुपयांच्या एक्सचेंज ऑफरचा लाभ घेतला जाऊ शकतो.