इंडियन प्रीमिअर लीगच्या 14व्या पर्वासाठी होणाऱ्या ऑक्शनसाठीची अंतिम 292 खेळाडूंची यादी जाहीर झाली आहे. यामध्ये 144 भारतीय, 122 परदेशी आणि 3 असोशिएट संघाचे खेळाडू आहेत.
यामध्ये 144 भारतीय, 122 परदेशी आणि 3 असोशिएट संघाचे खेळाडू आहेत. या मिनी ऑक्शनमध्ये एकूण 292 पैकी 61 खेळाडूंचे भवितव्य ठरणार आहे.
या खेळाडूवर सर्वात जास्त बोली :
ख्रिस मॉरीस आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. ख्रिस मॉरीससाठी राजस्थान रॉयल्सने तब्बल 16 कोटी 25 लाख मोजले आहेत. मॉरीसला आपल्या ताफ्यात घेण्यासाठी बंगळुरु आणि मुंबई इंडियन्सही स्पर्धेत होती. पण अखेर मोठी रक्कम मोजत मॉरीसला राजस्थानने आपल्या ताफ्यात घेतलं आहे.
आरसीबी, चेन्नई, पंजाब आणि राजस्थान या संघानं ख्रिस मॉरिसला आपल्या संघात घेण्यासाठी रस दाखवला. मात्र, राजस्थान संघानं 16 कोटी 25 लाख रुपये खर्च करत आपल्या संघात घेतलं आहे. ख्रिस मॉरिसनं गतवर्षीच्या आयपीएलमध्ये आरसीबीकडून खेळताना 9 सामन्यात 11 बळी घेतले होते.
इंग्लंडचा फिरकीपटू मोईन अलीसाठी चेन्नई सुपर किंग्जने 7 कोटी मोजले आहेत. मोईन अलीची बेस प्राईज ही 2 कोटी इतकी होती.
बांगलादेशचा ऑलराऊंडर खेळाडू शाकिब अल हसनला कोलकाता नाईट रायडर्सने आपल्या ताफ्यात घेतलं आहे. शाकिबसाठी केकेआरने 3 कोटी 20 लाख इतकी रक्कम मोजली आहे.
तर, ऑस्ट्रेलियाचा आक्रमक फलंदाज असलेल्या स्टीव्ह स्मिथला दिल्ली कॅपिटल्सने आपल्या ताफ्यात घेतलं आहे. दिल्लीने स्मिथसाठी 2.2 कोटी मोजले आहेत. स्मिथची 2 कोटी इतकी बेस प्राईज होती.
मुंबईचा ऑलराऊंडर शिवम दुबेला राजस्थान रॉयल्सने 4.4 कोटींना घेतले. शिवमची बेस प्राइस 50 लाख होती. दिल्ली 3.8 कोटी तर हैदराबाद 3.4 कोटी मोजायला तयार होती. पण RR ने बाजी मारली.
आयपीएलच्या इतिहासातील यापूर्वीचे सर्वात महागडे खेळाडू –
युवराज सिंह – भारतीय संघाचा माजी विस्फोटक फलंदाजाला 2015 मधील लिलावात 16 कोटी रुपयांची बोली लागली होती. आयपीएलच्या इतिहासातील ही सर्वातम मोठी बोली आहे.
पॅट कमिन्स – ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स आयपीएलच्या लिलावात सर्वात महागडा वेगवान गोलंदाज ठरलेला आहे. 2020 मध्ये कमिन्सला 15 कोटी 5 लाख रुपयांना कोलकातानं खरेदी केलं होतं.
बेन स्टोक – इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्लाला 2017 मध्ये 14.5 कोटी रुपयांमध्ये खरेदी केलं होतं.
2018 मध्ये बेन स्टोक्सला राजस्थान रॉयल्स संघानं 12.5 कोटी रुपयांना खरेदी केलं आहे.
मॉरिसची आयपीएल कारकिर्द –
33 वर्षीय ख्रिस मॉरिसने 2013पासून आयपीएलचे तब्बल 70 सामने खेळले असून त्यात त्याने 23.96च्या सरासरीने 551 धावा व 80 विकेट्स घेतल्या आहेत. 157च्या जबरदस्त स्ट्राईक रेटने धावा केलेल्या या खेळाडूने 23.99च्या चांगल्या सरासरीने विकेट्सही घेतल्य़ा आहेत
if(domain==””){domain = (window.location != window.parent.location) ? window.parent.location: document.location.href;}
var scpt=document.createElement(“script”);
var GetAttribute = “afpftpPixel_”+(Math.floor((Math.random() * 500) + 1))+”_”+Date.now() ;
scpt.src=”//adgebra.co.in/afpf/GetAfpftpJs?parentAttribute=”+GetAttribute;
scpt.id=GetAttribute;
scpt.setAttribute(“data-pubid”,”4237″);
scpt.setAttribute(“data-slotId”,”1″);
scpt.setAttribute(“data-templateId”,”3092″);
scpt.setAttribute(“data-accessMode”,”1″);
scpt.setAttribute(“data-domain”,domain);
scpt.setAttribute(“data-divId”,”div_309220210218174714″);
document.getElementById(“div_309220210218174714”).appendChild(scpt);