अफगाणिस्तानवर तालिबानने पूर्णपणे ताबा मिळवल्यानंतर त्यांनी आपली सर्व क्षेत्राविषयी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यात महत्वपूर्ण भूमिका महिलांच्या बाबतीत असल्याचे म्हटले जात आहे. 2001 पूर्वी अफगाणिस्तानवर पूणपणे तालिबानची सत्ता होती, तेव्हा अफगाणिस्तानमधल्या महिलांना खूप त्रास सहन करावा लागला असल्याचे सांगतले जाते. पुन्हा एकदा तशीच परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे.
दैनंदिन जीवनात महिला आणि मुलींना तालिबानी नेत्यांनी केलेल्या नियमांनुसार राहावं लागणार असून नियम न पाळल्यास अत्यंत कठोर शिक्षा केली जाणार आहे. तालिबानने आता महिलांच्या अधिकारांसंदर्भात आपली भूमिका शिथिल केली. असं त्यांचे म्हणणे आहे मात्र दैनंदिन जीवनात महिला आणि मुलींना तालिबानी नेत्यांनी केलेल्या ही नियमावली महिलांच्या स्वातंत्र्यावर गदा आणणारी आहे. जाणून घेऊया अफगाणिस्तानमधल्या महिलांनासाठी तालिबानचे नवे नियम कोणते…
तालिबानचे नियम खालीलप्रमाणे :
▪️ महिलांना कोणत्याही जवळच्या नातेवाईकांशिवाय घराबाहेर जाता येणार नाही.
▪️ महिलांना घराबाहेर जाताना नेहमी बुरखा घालावाच लागेल.
▪️ पुरुषांना महिलांच्या चालण्याचा/पावलांचा आवाज ऐकू येऊ नये. म्हणून महिलांना हाय हिल्स (High Heels) सँडल्स घालता येणार नाहीत.
▪️ सार्वजनिक ठिकाणी अनोळखी लोकांसमोर महिलांचा आवाज ऐकू येता कामा नये.
▪️ घरामध्ये असणाऱ्या महिलांना कोणी पाहू नये, यासाठी तळमजल्यावर असणाऱ्या घरांच्या खिडक्या पारदर्शक नसाव्यात. त्या रंगवलेल्या असल्या पाहिजेत.
▪️ महिलांना त्यांचे फोटो काढता येणार नाहीत. तसंच त्यांचे फोटो वर्तमानपत्र किंवा पुस्तकात छापता येणार नाहीत, घरातही लावता येणार नाहीत.
▪️ कोणत्याही ठिकाणाच्या नावात महिला हा शब्द असला, तर तो काढून टाकावा लागणार
▪️ महिलांना घराची बाल्कनी किंवा खिडकीत उभं राहता येणार नाही, जेणेकरून तिथून त्या बाहेरच्या कोणाला दिसता कामा नयेत.
▪️ महिलांना कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमामध्ये भाग घेता येणार नाही.
▪️ महिलांना नेल पेंट (Nail Paint) लावता येणार नाहीत. तसंच स्वेच्छेने लग्न करता येणार नाही.
नियमांचं पालन न केल्यास नेमकी शिक्षा काय?
▪️ तालिबानी त्यांच्या क्रूर शिक्षेसाठीही कुख्यात आहेत. त्यांनी बनवलेले नियम कोणत्याही महिलेने तोडल्यास तिला क्रूर शिक्षेला सामोरे जावे लागते. तालिबानच्या पूर्वीच्या राजवटीत सार्वजनिक स्थळी अपमान आणि महिलांवरचे अत्याचार ही एक सामान्य बाब होती.
▪️ व्यभिचार किंवा अनैतिक संबंधांसाठी महिलांना सार्वजनिक ठिकाणी मारलं जातं.
▪️ घट्ट कपडे घातल्याससुद्धा अशीच शिक्षा दिली जाते.
▪️ एखाद्या मुलीने ठरवलेलं लग्न (Arrange Marriage) करण्यास नकार देऊन पळून जाण्याचा प्रयत्न केल्यास मुलीचं नाक आणि कान कापले जातात.
▪️ नेलपेंट लावलं तर बोटं कापली जातात.
▪️ तालिबानी राजवटीमध्ये अशाप्रकारे अत्यंत क्रूर शिक्षा दिली जाते. एवढ्या भयानक निर्बंधामध्ये महिलांना जीवन जगणं साहजिकच अत्यंत असह्य होतं.