आयसीसीने या वर्षी होणाऱ्या टी-20 वर्ल्डकप स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. कोरोना विषाणूमुळे, भारतात होणारी ही स्पर्धा आता ओमान आणि यूएईमध्ये आयोजित केली जात आहे. टी-20 वर्ल्डकप 17 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. जेतेपदाचा सामना 14 नोव्हेंबर रोजी खेळला जाईल. भारत 24 ऑक्टोबरपासून आपल्या मोहिमेला सुरुवात करणार आहे. भारताचा पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध होणार आहे.
आयसीसीने या स्पर्धेसाठी दोन ग्रुप तयार केले आहे. ग्रुप ए मध्ये ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, वेस्ट इंडिज यांचा समावेश आहे तर ग्रुप बी मध्ये भारत, पाकिस्तान, न्यूझीलंड, अफगाणिस्तान या देशांचा समावेश आहे. दोन्ही ग्रुपमधील अन्य दोन संघ पात्रता फेरीनंतर ठरतील.
ग्रुप बी मधील पहिली लढत 24 ऑक्टोबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्या लढतीने होईल. ही लढत दुबईत होणार आहे. या ग्रुपमधील अखेरची लढत देखील भारताच्या सामन्याने होणार आहे. 8 नोव्हेंबर रोजी भारत पात्रता फेरीतील दुसऱ्या क्रमांकाच्या संघासोबत लढेल.
पात्रता फेरीत सहभागी संघ
गट 1 – श्रीलंका, आयर्लंड, नेदरलॅन्ड, नामिबिया
गट 2 – बांगलादेश, स्कॉटलंड, पपुआ न्यू गिनी, ओमान
पात्रता फेरीचं वेळापत्रक
17 ऑक्टोबर – ओमान वि. पपुआ न्यू गिनी आणि बांगलादेश वि. स्कॉटलंड
18 ऑक्टोबर – आयर्लंड वि. नेदरलँड्स आणि श्रीलंका वि. नामिबिया
19 ऑक्टोबर – स्कॉटलंड वि. पपुआ न्यू गिनी आणि ओमान वि. बांगलादेश
20 ऑक्टोबर – नामिबिया वि. नेदरलँड्स आणि श्रीलंका वि. आयर्लंड
21 ऑक्टोबर – बांगलादेश वि. पपुआ न्यू गिनी आणि ओमान वि. स्कॉटलंड
22 ऑक्टोबर – नामिबिया वि. आयर्लंड आणि श्रीलंका वि. नेदरलँड्स
सुपर 12 फेरीतील संघ :
गट 1 – ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, द. आफ्रिका, वेस्ट इंडिज, गट एकचा विजेता आणि गट दोनचा उपविजेता.
गट 2- भारत, पाकिस्तान, न्यूझीलंड, अफगाणिस्तान, गट एकचा उपवजेता आणि गट दोनचा विजेता.
सुपर 12 चे वेळापत्रक
ग्रुप 1
23 ऑक्टोबर – ऑस्ट्रेलिया वि. दक्षिण आफ्रिका, दुबई, वेळ दुपारी 3.30 वाजता
– इंग्लंड वि. वेस्ट इंडिज, दुबई , वेळ सांयकाळी 7.00 वाजता
24ऑक्टोबर – अ गटातील अव्वल वि. ब गटातील उपविजेता. शाहजाह, वेळ दुपारी 3.30 वाजता
दक्षिण आफ्रिका वि. वेस्ट इंडिज, दुबई, वेळ दुपारी 3.30 वाजता
27 ऑक्टोबर – इंग्लंड वि. ब गटातील उपविजेता, अबु धाबी, वेळ सायंकाळी 7.30 वाजता
28 ऑक्टोबर – ऑस्ट्रेलिया वि. अ गटातील अव्वल, दुबई, वेळ सायंकाळी 7.30 वाजता
29 ऑक्टोबर – वेस्ट इंडिज वि. ब गटातील उपविजेता, शारजाह, वेळ दुपारी 3.30 वाजता
30 ऑक्टोबर – दक्षिण आफ्रिका वि. अ गटातील अव्वल, शाहजाह, वेळ – दुपारी 3.30 वाजता
इंग्लंड वि. ऑस्ट्रेलिया, दुबई, सायंकाळी 7.30 वाजता
1 नोव्हेंबर – इंग्लंड वि. अ गटातील अव्वल, शाहजाह, सायंकाळी 7.30 वाजता
2 नोव्हेंबर – दक्षिण आफ्रिका वि. ब गटातील उपविजेता, अबु धाबी, वेळ दुपारी 3.30 वाजता
4 नोव्हेंबर – ऑस्ट्रेलिया वि. ब गटातील उपविजेता, दुबई, वेळ दुपारी 3.30 वाजता
वेस्ट इंडिज वि. अ गटातील अव्वल, अबु धाबी, वेळ सायंकाळी 7.30 वाजता
6 नोव्हेंबर – ऑस्ट्रेलिया वि. वेस्ट इंडिज, अबु धाबी, वेळ दुपारी 3.30 वाजता
ग्रुप 2
24ऑक्टोबर – भारत वि. पाकिस्तान, दुबई, वेळ सायंकाळी 7.30 वाजता
25 ऑक्टोबर – अफगाणिस्तान वि. ब गटातील अव्वल, शाहजाह, सायंकाळी 7.30 वाजता
26 ऑक्टोबर – पाकिस्तान वि. न्यूझीलंड, शाहजाह, सायंकाळी 7.30 वाजता
27 ऑक्टोबर – ब गटातील अव्वल वि. अ गटातील उपविजेता, अबुधाबी, वेळ सायंकाळी 7.30 वाजता
29 ऑक्टोबर – अफगाणिस्तान वि. पाकिस्तान, दुबई, वेळ सायंकाळी 7.30 वाजता
2 नोव्हेंबर – पाकिस्तान वि. अ गटातील उपविजेता, अबु धाबी, सायंकाळी 7.30 वाजता
3 नोव्हेंबर – न्यूझीलंड वि. ब गटातील अव्वल, दुबई, दुपारी 3.30 वाजता
भारत वि, अफगाणिस्तान, अबु धाबी, वेळ सायंकाळी 7.30 वाजता
5 नोव्हेंबर – भारत वि. ब गटाती अव्वल, दुबई, वेळ सायंकाळी 7.30 वाजता
7 नोव्हेंबर – न्यूझीलंड वि. अफगाणिस्तान, अबु धाबी, दुपार 3.30 वाजता
पाकिस्तान वि. ब गटातील अव्वल, शाहजाह, सायंकाळी 7.30 वाजता
8 नोव्हेंबर – भारत वि. अ गटातील उपविजेता, दुबई, सायंकाळी 7.30 वाजता
सेमीफायनल आणि फायनल
टी-20 वर्ल्डकपमधील साखळी फेरीतील लढतीनंतर सेमीफायनलच्या लढती सुरू होतील. पहिली लढत 10नोव्हेंबर रोजी अबुधाबी मैदानावर संध्याकाळी सहा वाजता सुरू होईल. तर दुसरी लढत 11नोव्हेंबर रोजी दुबईत होणार आहे. दोन्ही लढतींसाठी आयसीसीने राखीव दिवस ठेवला आहे. अंतिम लढत 14 नोव्हेंबर रोजी दुबईत संध्याकाळी सहा वाजल्यापासून होईल. या लढतीसाठी देखील राखीव दिवस ठेवण्यात आला आहे.