इंडियन प्रीमीयर लीग (ipl) 2021 चा उर्वरित हंगाम 19 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर दरम्यान संयुक्त अरब अमिराती येथे पार पडणार असल्याचे 25 जुलै रोजी बीसीसीआयने स्पष्ट केले आहे. बीसीसीआयने उर्वरित आयपीएल 2021 चे वेळापत्रक जाहीर केले असून 19 सप्टेंबरला आयपीएल 2021 च्या दुसऱ्या टप्प्यातील पहिला सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात दुबई येथे पार पडणार आहे.
आयपीएल 2021 हंगामाचा पहिला टप्पा एप्रिल-मे दरम्यान भारतात पार पडला होता. त्यावेळी 29 सामन्यांनतर कोरोनाच्या संकटामुळे हा हंगाम स्थगित करावा लागला होता. आता या हंगामातील दुसऱ्या टप्प्यात उर्वरित 31 सामने युएईतील दुबई, शारजाह आणि अबुधाबी या 3 शहरात एकूण 27 दिवसात खेळवण्यात येतील.. मात्र आता IPL पुन्हा सुरू होण्यापूर्वी, आयपीएलचे सर्व सामने सुरळीत पार पडावे यासाठी BCCI ने कडक नियम लागू केल्याचं सांगण्यात येत आहे.
IPL 2021 चे बदललेले नियम :
यूएईमध्ये होणाऱ्या आयपीएलमध्ये चेंडू स्टँडमध्ये गेला तर त्याच्या जागी दुसरा चेंडू वापरला जाणार आहे. यामुळे कोरोनाविषयक खबरदारी बाळगली गेली आहे. चेंडूची पकड मजबूत होण्यासाठी, वळविण्यासाठी गोलंदाज चेंडूला थुंकी लावतात, ती आता लावता येणार नाही. जेणेकरून कोरोना संसर्गाची शक्यता कमी होईल. समजा, जर तसं काही घडलंच तर अंपायर इशारा देऊन दंड म्हणून प्रतिस्पर्धी टीमला 5 धावा देतील.
UAE ला जाण्याच्या आधी, खेळाडू व कर्मचाऱ्यांना कोरोनाशी संबंधित RTPCR चाचणी करून घ्यावी लागेल. ही चाचणी 72 तासांपूर्वी करणं गरजेचं आहे, असं सांगितलं आहे. आरटी-पीसीआर चाचणी केलेल्या खेळाडू व कर्मचाऱ्यांना आता वेगवेगळ्या ठिकाणी विलगीकरण कक्षात ठेवलं जाणार आहे. एखाद्या खेळाडूला आवश्यक कारण असेल, तरच बाहेर पडण्याची परवानगी दिली जाणार आहे.
खेळाडूंना व कर्मचारी यांना सुरक्षित समजल्या जाणाऱ्या बायोबबलमध्ये (Bio-Bubble) पुन्हा परतण्यासाठी 6 दिवस क्वारंटाईनमध्ये राहावं लागणार आहे. यामध्ये त्यांची दर दुसऱ्या दिवसाला कोरोना चाचणी करून रिपोर्ट निगेटिव्ह आला, तरच खेळाडूंना स्पर्धेसाठी आवश्यक गोष्टींसाठी परवानगी दिली जाईल व ते आयपीएलसाठी पात्र ठरतील.
जाणून घ्या उर्वरित मोसमाचे संपूर्ण वेळापत्रक…
19 सप्टेंबर – मुंबई इंडियन्स VS चेन्नई सुपर किंग्स, संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून – दुबई
20 सप्टेंबर – कोलकाता नाइट रायडर्स VS रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून – अबू धाबी
21 सप्टेंबर – पंजाब किंग्स VS राजस्थान रॉयल्स, संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून – दुबई
22 सप्टेंबर – दिल्ली कॅपिटल्स VS सनरायझर्स हैदराबाद, संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून – दुबई
23 सप्टेंबर – मुंबई इंडियन्स VS कोलकाता नाइट रायडर्स, संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून – अबू धाबी
24 सप्टेंबर – रॉयल चँलेंजर्स बंगळुरू VS चेन्नई सुपर किंग्स, संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून – शाहजाह
25 सप्टेंबर – दिल्ली कॅपिटल्स VS राजस्थान रॉयल्स, दुपारी 3.30 वाजल्यापासून – अबू धाबी
25 सप्टेंबर – सनयारझर्स हैदराबाद VS पंजाब किंग्स, संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून – शाहजाह
26 सप्टेंबर – चेन्नई सुपर किंग्स VS कोलकाता नाईट रायडर्स, दुपारी 3.30 वाजल्यापासून – अबू धाबी
26 सप्टेंबर – पंजाब किंग्स VS मुंबई इंडियन्स, संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून – दुबई
27 सप्टेंबर- सनरायझर्स हैदराबाद VS राजस्थान रॉयल्स, संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून – दुबई
28 सप्टेंबर – कोलकाता नाइट रायडर्स VS दिल्ली कॅपिटल्स, दुपारी 3.30 वाजल्यापासून – शारजाह
28 सप्टेंबर – मुंबई इंडियन्स VS पंजाब किंग्स, संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून – अबू धाबी
29 सप्टेंबर – राजस्थान रॉयल्स VS रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून – दुबई
30 सप्टेंबर – सनरायझर्स हैदराबाद VS चेन्नई सुपर किंग्स, संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून – शारजाह
1 ऑक्टोबर – कोलकाता नाइट रायडर्स VS पंजाब किंग्स, संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून – दुबई
2 ऑक्टोबर – मुंबई इंडियन्स VS दिल्ली कॅपिटल्स, दुपारी 3.30 वाजल्यापासून – शारजाह
2 ऑक्टोबर – राजस्थान रॉयल्स VS चेन्नई सुपर किंग्स, संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून – अबू धाबी
3 ऑक्टोबर – पंजाब किंग्स VS रॉयल चँलेंजर्स बंगळुरू, दुपारी 3.30 वाजल्यापासून – शारजाह
3 ऑक्टोबर – कोलकाता नाइट रायडर्स VS सनरायझर्स हैदराबाद, संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून – दुबई
4 ऑक्टोबर – दिल्ली कॅपिटल्स VS चेन्नई सुपर किंग्स, संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून – दुबई
5 ऑक्टोबर – मुंबई इंडियन्स VS राजस्थान रॉयल्स, संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून – शारजाह
6 ऑक्टोबर – रॉयल चँलेंजर्स बंगळुरू VS सनरायझर्स हैदराबाद, संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून – अबू धाबी
7 ऑक्टोबर – चेन्नई सुपर किंग्स VS पंजाब किंग्स, दुपारी 3.30 वाजल्यापासून – दुबई
7 ऑक्टोबर – कोलकाता नाइट रायडर्स VS राजस्थान रॉयल्स, संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून – शारजाह
8 ऑक्टोबर – सनरायझर्स हैदराबाद VS मुंबई इंडियन्स, दुपारी 3.30 वाजल्यापासून – अबू धाबी
8 ऑक्टोबर – रॉयल चँलेंजर्स बंगळुरू VS दिल्ली कॅपिटल्स, संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून – दुबई
10 ऑक्टोबर – क्वालिफायर, संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून – दुबई
11 ऑक्टोबर – एलिमिनेटर, संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून – शारजाह
13 ऑक्टोबर – क्वालिफायर 2, संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून – शारजाह
15 ऑक्टोबर- अंतिम सामना, संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून – दुबई
दरम्यान, आयपीएल 2021 मध्ये भारतात खेळवण्यात आलेल्या पहिल्या टप्प्यात रिषभ पंतच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सने 8 पैकी 6 सामने जिंकून 12 गुणांसह अव्वल स्थान पटकावलं आहे. चेन्नई सुपर किंग्सने 7 पैकी 5 सामने जिंकून दुसरा क्रमांक मिळवला आहे. विराट कोहलीचा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ 10 गुणांसह तिसऱ्या नंबरवर आहे. मुंबई इंडियन्स (8), राजस्थान रॉयल्स (6), पंजाब किंग्स (6), कोलकाता नाइट रायडर्स (4) आणि सनरायझर्स हैदराबाद (2) हे संघ अनुक्रने चौथ्या ते आठव्या क्रमांकावर आहेत