आधार कार्ड ही प्रत्येकासाठी अत्यंत महत्त्वाची गोष्ट झाली आहे. प्रत्येक सरकारी कामांमध्ये आपली ओळख दाखवण्याचे एक प्रमाणपत्र म्हणून आधार कार्ड कडे बघितले जाते.
आता हेच आधार कार्ड पाच वर्षांच्या खालील मुलांनादेखील बंधनकारक होणार आहे. याआधी मुलांचे फिंगर प्रिंट स्कॅन करून घेतले जात नव्हते.
मात्र, आता फिंगरप्रिंट स्कॅन करून बायोमेट्रिक अपडेट करून घेणे बंधनकारक होणार आहे, किंबहुना ते झालेही आहे. यूआयडीएआयच्या अधिकृत ट्विटर हँडल वरून ही माहिती देण्यात आली आहे.
आता जर तुमच्या घरात पाच वर्षांखालील एखादे मूल असेल तर त्याच्या आधार कार्ड काढण्याची प्रक्रिया नेमकी काय आहे. त्याची नोंदणी कशी करायची याबाबत माहिती जाणून घेणे महत्त्वाचे आहे. म्हणूनच आज आपण ही माहिती जाणून घेणार आहोत.
यासाठी प्रथम आपल्याला यूआयडीएआयच्या अधिकृत वेबसाइटवर आधार कार्ड रजिस्ट्रेशन अर्थात नोंदणी लिंकवर क्लिक करावे लागेल.
– मुलाचं नाव, आई-वडिलांचं नाव इत्यादी आवश्यक माहिती तसंच आधार नोंदणी अर्जही भरा
– निवासी पत्ता, जिल्हा, शहर, राज्य इत्यादी माहिती भरा
– नंतर अपॉइंटमेंट बटणावर क्लिक करा आणि आधार कार्ड रजिस्ट्रेशनसाठीची सोयीची वेळ निवडा. तुम्ही तुमच्या घराजवळील आधार नोंदणी केंद्र निवडू शकता.
– अपॉइंटमेंट असलेल्या तारखेला मुलाचे जन्म प्रमाणपत्र, पालकांच्या आधार कार्डाची प्रत आणि रेफरन्स नंबर घेऊन या केंद्रावर जा.
– इथं सर्व कागदपत्रांची पडताळणी होईल आणि 5 वर्षांखालील मुलाचा फोटो घेतला जाईल. त्यानंतर पालकांची बायोमेट्रिक माहिती मुलाच्या आधार कार्डशी जोडली जाईल.
– सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर एक नंबर दिला जाईल, ज्याच्या मदतीनं तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती जाणून घेऊ शकता.
– 60 दिवसांनंतर नोंदणीकृत मोबाइल नंबरवर एक एसएमएस येईल आणि अर्ज केल्यापासून 90 दिवसांच्या आत तुमच्या मुलाचे आधार कार्ड घरपोच पाठवले जाईल.
5 वर्ष झाल्यानंतर मुलाची बायोमेट्रिक माहिती अपडेट करून त्याचे नूतनीकृत आधारकार्ड घेणं आवश्यक आहे. अन्यथा त्याचे आधार कार्ड उपयोगी ठरणार नाही.