फुटबॉलर रोनाल्डोचे दोन शब्द पडले महागात; कोका कोला कंपनीला झाले ‘इतक्या’ कोटींचे नुकसान! काय आहे ही भानगड जाणून घ्या
पोर्तुगाल संघाचा कर्णधार क्रिस्टियानो रोनाल्डो या फुटबॉलर चे जगभरात असंख्य चाहते आहेत. अगदी त्याच्यासाठी फुटबॉल बघणारे रसिक देखील आपल्याला विविध देशांमध्ये पाहायला मिळतात रोनाल्डो हा नेहमी आरोग्य विषयक सल्ला त्याच्या चाहत्यांना देत असतो. आपण अनेकदा मोठ्या लोकांनी बोललेले शब्द त्यांचे चाहते फॉलो करतात, असे पाहिले आहे.
मात्र, त्यामुळे कोणाला नुकसान झाले आहे, असे आपल्या कधीही पाहण्यात आले नसेल. रोनाल्डोने असेच दोन शब्द बोलले आणि कोका-कोला या कंपनीला करोडो रुपयांचे नुकसान झाले. हे नुकसान 30 हजार कोटी एवढे आहे. नेमके काय आहेत त्याचे ते शब्द आणि काय आहे त्याचा कोकाकोलाची संबंध जाणून घ्या!
पत्रकार परिषदेत टेबलावर कोका कोलाची बाटली ठेवण्यात आली होती. ही गोष्टी रोनाल्डोला आवडली नाही. त्याने कोका कोलाची बाटली बाजूला केली आणि सॉफ्ट ड्रिंक्सच्या ऐवजी पाणी देण्यास सांगितले.
https://twitter.com/FutbolBible/status/1404522910107291650?s=20
या पत्रकार परिषदेला पोर्तुगाल संघाचे व्यवस्थापक फर्नांडो देखील उपस्थित होते. अर्थात फर्नांडो यांनी टेबलावरील कोका कोलाची बाटली हटवली नाही. पण रोनाल्डोने केलेल्या कृतीचा व्हिडियो सोशल मीडियावर व्हायरल झाला.
रोनाल्डोचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कोका कोला कंपनीचे मोठे नुकसान झाले. कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. कोकचे शेअर्स 1.6 टक्क्यांनी घसरले. त्याची किमत 242 बिलियन डॉलरवरून 238 बिलियन डॉलरवर आली. भारतीय रुपयात त्यांना 29 हजार 300 कोटींचे नुकसान झाले.
कंपनीने मात्र कोणी काय करावे हा ज्याचा त्याचा निर्णय असून प्रत्येकाची आवड वेगळी असते. असे म्हणत, या विषयाला पूर्णविराम दिला आहे.