कोरोना उपचारासाठी उपयुक्त असे प्लाज्मा अन् रेमडेसिविरसाठी कसं व कुठे मिळालं? जाणून घ्या एका क्लिकवर..
जगभरात कोविड 19 चा प्रादुर्भाव वाढत असताना सध्या भारतात या साथीच्या रोगावर उपचार करण्यासाठी प्लाझ्मा थेरपीचा वापर करण्यावर भर देण्यात येत आहे. तर कोरोना महामारीने भारतात अतिशय कहर माजवला आहे. देशातील बऱ्याच राज्यात कोरोना हा अतिशय जीवघेणा ठरत आहे. तर लसीकरण मोहीम सुरू असली तरी भारतात लोकसंख्येच्या समस्या पाहता, लसीकरणाला पूर्ण होण्यासाठी बराच काळ जाणार आहे असे चित्र दिसत आहे.
भारत सरकार कडून सतत प्लाज्मा साठी लोकांनी पुढे यावे असे अनेकदा निवेदने आलेली आहेत. तर आपल्यापैकी बऱ्याच लोकांच्या घरात कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. आपल्या कुटुंबियांसाठी तुम्ही प्लाज्मा आणि रेमेडिसेविर शोधत असाल तर, तुमच्यासाठी आम्ही हा शोध सोपा करत आहोत. मात्र, त्या आधी जाणून घेऊया प्लाझ्मा थेरपी म्हणजे काय?
अशी करतात प्लाझ्मा थेरपी!
कोरोनामुक्त झालेल्या रुग्णाच्या रक्तामध्ये विषाणूंच्या संसर्गामुळे निर्माण झालेल्या अँटीबॉडीज असतात. त्याचा वापर अत्यवस्थ कोरोनाग्रस्त रुग्णांवर या माध्ममातून करता येणार आहे. त्यासाठी कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तीचे दोनशे मिली रक्त घेतले जाते. त्यातून प्लाझ्मा वेगळा केला जातो. तो प्लाझ्मा कोरोनासह मधुमेह, उच्च रक्तदाब, असे विकार असणाऱ्या रुग्णाच्या उपचारासाठी वापरला जातो.
दरम्यान, अशातच ऑक्सिजन, बेड, हॉस्पिटल, आरोग्य सुविधा राज्य आणि केंद्र सरकार देण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, झपाट्याने वाढणारी रुग्णांची आकडेवारी आरोग्य सुविधांना तुटवडा पाडत आहे. यासाठी आम्ही आज तुम्हाला अशाच काही वेबसाईड्सबद्दल सांगणार आहोत.
प्लाज्मा डोनर आणि रेमेडिसेविर मिळवण्यासाठी करा या सोप्या पद्धती :
◼️ सोशल मीडियावर, मायक्रो ब्लॉगिंग वेबसाइट्स वर तुम्ही प्लाज्मा डोनर आणि रेमेडिसेविर साठी मदत मागू शकता.
◼️ https://dhoondh.com या वेबसाईटवर तुम्ही भारतातून कुठूनही प्लाज्मा डोनेट किंवा मिळवण्यासाठी माहिती देऊ शकता. इथून मदत नक्की मिळेल.
◼️ https://plasmadonor.in/ ही वेबसाईट देशातील 12 शहरात सुविधा पुरवत आहे. याद्वारे सुद्धा तुमचा शोध सोपा होऊ शकतो.
◼️ https://needplasma.in/ आणि https://plasmaline.in/ या वेबसाइट्स वर निवेदन देऊन तुम्ही मदत मिळवू शकता.
◼️ रेमेडिसेविर इंजेक्शन पुरवण्यासाठी अनेक कंपन्या पुढे येत आहेत. सिपला या कंपनीत 8657311088 या क्रमांकावर फोन करून तुम्ही विचारपूस करू शकता.
◼️ 040-40473535 हा हेट्रो या रेमेडिसेविर इंजेक्शन बनवण्याऱ्या देशातील मोठ्या कंपनीचा नंबर आहे. यावरून सुद्धा तुम्हाला माहिती आणि मदत मिळू शकते.
◼️ जुबिलिइंट या कंपनीशी 9819857718 या क्रमांकावर संपर्क साधून मदत मिळू शकते.
◼️ 7829980066 हा मिलान या कंपनीचा नंबर आहे.
◼️ infoavailability@cipla.com, rc.kaushik@linde.com, vkas.bansi@jubl.com, kumar.subramaniam@mylan.in