अवघे काही तास शिल्लक! सर्वप्रथम करा हे काम अन्यथा तुम्हाला बसेल आर्थिक भुर्दंड.
[sc name=”adg”]
मार्च महिना आपल्याकडे आर्थिक वर्षाचा शेवट म्हणून ओळखला जातो. त्यामुळे मार्च एंड आपल्याकडे परवलीचा शब्द झाला आहे. या महिन्यात नवीन काही ना काही येतेच किंवा मुदत तरी संपलेली असते. त्या दिवसांत लक्ष दिले नाहीतर भुर्दंड पडतो. यंदाही तसंच आहे. आता सरकारने आधार आणि पॅन कार्ड बऱ्याच व्यवहारात आवश्यक केलंय.
पॅन-आधार जोडणे: पॅनकार्डसह आधार कार्ड जोडण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2021 आहे. या अंतिम मुदतीनुसार आपण पॅन आणि आधार लिंक न केल्यास आपला पॅन निष्क्रिय होईल. तसेच तुम्हाला दंडही भरावा लागेल. आयकर कायदा नवीन कलम 244 एच अंतर्गत हा दंड आकारला जाईल. मोदी सरकारने 23 मार्च रोजी लोकसभेत मंजूर केलेल्या वित्त विधेयक 2021 च्या नुसार ही कारवाई होईल.
मुदतीच्या आता हे लिकिंग न केल्यास आर्थिक व्यवहारांसाठी पॅन कार्डचा वापर करता येणार नाही. बँकेत खातं उघडण्यासारखी आर्थिक व्यवहारांशी संबधित कामांसाठी पॅन कार्डचा उपयोग होणार नाही. तसंच गॅस अनुदान, शिष्यवृत्ती, निवृत्ती वेतन आदी सरकारी लाभही मिळणार नाहीत.
[sc name=”adg”]
पॅनकार्ड कसे जोडाल आधार कार्डशी?
▪️ आयकर विभागाच्या अधिकृत वेबसाइट incometaxindiaefiling.gov.in वर लॉगइन करा.
▪️ इथे तुम्हाला आधार लिंक करण्याचा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा.[sc name=”adg”]
▪️ त्यानंतर तुमचा पॅन नंबर, आधार क्रमांक, तुमचे नाव खाली असलेल्या बॉक्समध्ये भरा.
▪️ यानंतर कॅप्चा कोड काळजीपूर्वक पाहा आणि बॉक्समध्ये भरा.
▪️ सर्व माहिती भरल्यानंतर आधारशी लिंक अशा पर्यायावर क्लिक करा.
[sc name=”adg”]
एसएमएसद्वारे पॅनला आधारशी लिंक कसे कराल?
जर आपण आयकर विभागाच्या ई-फाइलिंग वेबसाईटद्वारे आपला पॅन आणि आधार लिंक करण्यास सक्षम नसल्यास आपण एसएमएसद्वारे आपल्या पॅनला आधार क्रमांकाशी लिंक करू शकता.
यासाठी आपल्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरुन 567678 किंवा 56161 वर एसएमएस पाठवा. हे करण्यासाठी, आपल्या मोबाईलमध्ये UIDPAN (12 अंकी आधार क्रमांक) (10 अंकी पॅन) टाईप करा आणि ते 567678 किंवा 56161 वर पाठवावे.
[sc name=”adg”]