पालकांनो काळजी घ्या! कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत आपल्या घरातील मुलांना ‘ही’ लस देणं आवश्यक
सध्याच्या काळात कोरोनामुळे लसीकरण शब्द अत्यंत प्रचलित झाला आहे. आता सर्वच ठिकाणी कोरोना आणि त्यासाठी असणाऱ्या लसीकरणाचा उल्लेख वारंवार सर्वत्र केला जातो. कारण कि, एखाद्या विषाणूला रोखायचा असेल तर लसीकरण हा पर्याय सर्वोत्तम आहे असे अनेकदा बोलले जाते. त्यामुळे सध्याच्या महामारीच्या काळात सरकारने लसीकरणावर सर्वाधिक भर दिला आहे. भारतात बाळाला त्याच्या जन्मापासूनच वेगवेगळ्या लशी सातत्याने दिल्या जातात.
आता राज्यवर नवे संकट घोगावात आहे. कोरोना पाठोपाठ देशात म्युकर मायकोसिसचा प्रादुर्भाव वाढला आहे. तर महाराष्ट्रात मागील 20 दिवसात 30 हजारहून अधिक लहानमुलांना संसर्ग झाला आहे. त्याचं बरोबर राज्यात पावसाचं वातावरण कायम आहे. पावसाळा हा आपल्याबरोबर अनेक आजारही घेऊन येत असतो. अशा परिस्थितीत बालरोग तज्ञ आणि कोविड टास्क फोर्सने सर्वांसाठी महत्वपूर्ण सूचना केली आहे.
कोरोना महामारीच्या कठीण काळात बालरोग तज्ञ आणि कोविड टास्क फोर्सने बैठकीत तज्ञकडून पालकांना आपला लहान मुलांची काळजी घेण्याबाबत व लसीकरणासाठी महत्त्वाचे सल्ले दिले आहे. बालरोग तज्ञच्या म्हणण्यानुसार… पावसाळ्यापूर्वी राज्यात लहान मुलांचं लसीकरण करण्याचे आवाहन त्यानी पालकांना केले आहे. लहान मुलांना ‘इन्फ्लूएन्जा’ फ्लूची लस देणं गरजेचं आहे असे त्यानें म्हटलं आहे.
नेमके इन्फ्लूएन्जा म्हणजे काय?
इन्फ्लूएन्जा हा एक संसर्गजन्य आजार आहे. याची लक्षणं बऱ्याच प्रमाणात कोरोनाच्या लक्षणांसोबत मिळते-जुळते आहेत. तर खोकला, सर्दी, ताप आणि अंगदुखी ही याची प्रमुख लक्षणं आहेत.
या वयोगटासाठी लस आहे फायदेशीर : लहान मुलांचे वय सहा महिने आणि त्याहून अधिक असणाऱ्या सर्व मुलांना या फ्लूची लस देणे फायदेशीर आहे.
संभाव्य धोका : या फ्लूमुळे निमोनिया होण्याचीही शक्यता आहे. यात अनेकदा श्वास घेण्यासही त्रास जाणवू लागतो.
डॉक्टरांचा सल्ला : ज्या मुलांना श्वासनासंदर्भातील समस्या किंवा अस्थमा आहे, त्यांनीही ही लस घ्यावी असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. मात्र, लस घेतल्यास या आजाराचा धोका अधिक प्रमाणात कमी होतो.
तज्ज्ञांच्या माहितीनुसार, निमोनिया आणि कोरोनाच्या धोक्यापासून वाचण्यासाठी प्रत्येक लहान मुलांसाठी ही इन्फ्लूएन्जा लस घेणे अत्यंत गरजेची आहे. हि लस घेतल्यानंतर साधारणतः दोन दिवस ताप आणि अंगदुखी असे काही सामान्य असे साइड इफेक्ट्स जाणवतात. परंतु ही लस पूर्णपणे सुरक्षित आणि प्रभावी आहे.
टीप : आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती हि प्राथमिक स्वरुपाची आहे. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून सल्ला अवश्य घ्यावा. या माहितीची जबाबदारी “लेट्स टॉक मीडिया” घेत नाही.