गेल्या वर्षभरापासून कोरोना रुग्णांची वाढती संख्या जगभरासाठी डोकेदुखी ठरली आहे. भारतामध्ये सध्या कोरोनाची दुसरी लाट ओसरायला सुरुवात सुरुवात झाली असली तरी देखील, ग्रामीण भागात कोरोना हातपाय पसरत आहे. लसीकरणाला सुरुवात झाली असून, विविध लसी भारतात आणि इतर देशातून बनवल्या जात आहेत.
लसीकरण मोठ्या प्रमाणावर होत असले तरी देखील, कोरोना वर औषध शोधण्याची गरज तेवढीच जास्त होती. काहीच दिवसांपूर्वी डीआरडीओच्या इन्स्टिट्यूट ऑफ न्यूक्लिअर मेडिसिन अँड अलाइड सायन्सेस कोरोना वरील औषध शोधून काढले.
या औषधाची खासियत अशी की, यामुळे ऑक्सिजनची गरज रुग्णांना कमी लागणार आहे, असा दावा डीआरडीओ कडून करण्यात आला आहे. त्यामुळे, मध्यंतरी जाणवणारी ऑक्सिजनची कमतरता इथून पुढच्या काळात कमी जाणवेल आणि ऑक्सिजन न लावताच मध्यम ते गंभीर स्वरूपाचा रुग्ण कोरोनातून बरा होईल, असे देखील डीआरडीओने सांगितले आहे.
या औषधाची किंमत नेमकी किती असेल? आणि ते सामान्यांना परवडणारे असेल की नाही? असे बरेच प्रश्न प्रत्येकाच्या मनात होते. लसीकरणामुळे संसर्ग होण्याचे प्रमाण कमी करता येते.
मात्र, संसर्ग झाल्यानंतर त्यातून बरे होण्यासाठी औषध हवे आणि त्यामुळे डीआरडीओने काढलेले औषध ही करण्यासाठी नवसंजीवनी ठरत आहे. या औषधाची किंमत देखील सर्वसामान्यांना परवडण्यासारखी आहे. या औषधाच्या एका पाऊच साठी तुम्हाला 990 रुपये मोजावे लागणार आहेत. सरकारी दवाखाना, आरोग्यकेंद्रे यांना आणि केंद्र सरकारला हे औषध सवलतीच्या दरात उपलब्ध होणार आहे.
हैदराबादमधील डॉ. रेड्डी लॅबोरेटरीच या औषधाचं उत्पादन घेत आहे. ड्रग्ज कंट्रोल जनरल ऑफ इंडियाने (DCGI) 2-deoxy-D-glucose (2-DG) 8 मे रोजी या औषधाच्या आपात्कालीन वापराला मंजुरी दिली होती.
या औषधातून उपचार झालेल्या रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण मोठे असून, कोरोना मुक्त होणाऱ्यांची संख्या जास्त असल्याने या औषधाला लवकरच मंजुरी मिळाली. याचा वापर करुन लवकरच देश कोरोना मुक्त व्हावा आणि त्याबरोबरच जगाला देखील या औषधाचा पुरवठा भारताने करावा, अशीच सकारात्मक आशा सर्वांच्या मनात आहे.