देशात कोरोना ची दुसरी लाट आली आणि त्यानंतर लसीकरणाचे प्रमाणदेखील वाढले. अठरा वर्षा पासून ते अगदी वृद्ध व्यक्ती पर्यंत बऱ्याच लोकांनी आता लसीकरण पूर्ण केले आहे. अनेकांनी आपले फोटो सोशल मीडियावर सामायिक करून आपले प्रमाणपत्र देखील टाकले आहे.
मात्र, तुम्ही टाकलेले हे प्रमाणपत्र तुम्हालाच एखाद्या अडचणीत टाकू शकते हे तुम्हाला माहीत नसेल. जाणून घ्या प्रमाणपत्र किंवा लसीकरण पूर्ण केल्याचे सर्टीफिकेट सोशल मीडियावर टाकल्याने काय गोंधळ उडू शकतो याबद्दल:
गृह मंत्रालयाने ट्विटरवर सायबर दोस्त अकाऊंटवरून एक सूचना जारी केली आहे. हे ट्विटर हँडलर वापरकर्त्यांना सायबर सेफ्टी आणि सायबर सिक्योरिटी बद्दल माहिती देते. हे हँडल वापरकर्त्यांना लसीकरण प्रमाणपत्र सामायिक करण्यास प्रतिबंधित करीत आहे.
सायबर दोस्तने ट्विट केले आहे की, तुमचे लसीकरण प्रमाणपत्र तुमच्या सामाजिक माध्यमातून शेअर करणे धोकादायक ठरू शकते. यातून काही चलाख लोक तुमची वैयक्तिक माहिती चोरून तुमची फसवणूक करू शकतात.
कसे मिळते सर्टिफिकेट?
कोविडची पहिली लस मिळताच सरकार आपल्याला एक सर्टिफिकेट देते ज्यामध्ये लसविषयी संपूर्ण माहिती दिली जाते.
प्रमाणपत्रात, लसीकरण केंद्र, आधार कार्डचे शेवटचे 4 अंकी कोड आणि आपल्या दुसर्या डोसची तारीख देखील तेथे आहे. प्रथम प्रमाणपत्र प्रोविज्नल आहे आणि दोन्ही डोस नंतरच आपल्याला दुसरे प्रमाणपत्र मिळते.
लसीकरण प्रमाणपत्र आपल्या आधार कार्डासारखे आहे. कारण आपण आता इथुनपुढे भविष्यात कुठेही गेलात तर, आपल्याला आपले लसीकरण प्रमाणपत्र दर्शवावे लागेल.
पहिल्या डोसनंतर आपण सहजपणे आपले प्रमाणपत्र डाउनलोड करू शकता. आपण कोवीन पोर्टल किंवा आरोग्य सेतु अॅपवर जाऊन हे सर्व करू शकता.