कोरोना चे संकट जगावर धडकल्यानंतर आपल्याला विविध गोष्टींची माहिती नव्याने होऊ लागली. स्वतःची काळजी, इतरांची काळजी त्याचबरोबर स्वच्छतेचे महत्त्व देखील कोरोना ने पुन्हा नव्याने पटवून दिले!
असे असले तरीदेखील कोरोनातून एकदा बाहेर पडल्यानंतर आपण सुटलो, असे वाटत असल्यास तुम्ही चुकीचा विचार करत आहात.
कोरोना होऊन गेल्यानंतर सुद्धा अनेक गोष्टींची काळजी घेणे गरजेचे असते. यातच महत्वाच्या गोष्टी म्हणजे तुमचे ओवरऑल चेक अप करून घेणे गरजेचे होते.
हे चेक अप करताना नेमक्या कोणत्या टेस्ट करणे तुमच्यासाठी अनिवार्य असणार आहे, याची माहिती या लेखातून आम्ही तुम्हाला देणार आहोत!
CBC : शरीरातील हिमोग्लोबिन, प्लेटलेट्स, डब्ल्यूबीसी याची एकंदरीत स्थिती काय आहे, हे जाणून घेण्यासाठी ही टेस्ट केली जाते. विलगीकरणातून बाहेर आल्यानंतर सुद्धा तुम्हाला ताप आणि खोकल्याची समस्या जाणवत असल्यास, ही टेस्ट करणे गरजेचे असते.
CRP : पुराना ची टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतर सुद्धा डोकेदुखी आणि खोकला जाणवत असल्यास शरीरात इन्फेक्शन किती आहे, हे शोधण्यासाठी ही टेस्ट करणे आवश्यक आहे.
D-Dimer : कोरोना झाल्यानंतर अनेकांना रक्ताच्या गुठळ्या होण्याची समस्या जाणवलेली आपण ऐकली असेल. असे होत असल्यास, किंवा असे होऊ नये म्हणून देखील खात्री करून घेण्यासाठी एकदा ही टेस्ट करून घ्यावी.
LDH : कोणाची गंभीर किंवा सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांमध्ये इन्फेक्शन झाल्यानंतर चार ते सात दिवसांनी ही टेस्ट केली जाते. या टेस्टच्या साह्याने शरीरात टिशू लॉस किती झाला आहे, याचा शोध घेतला जातो.
SEROTONIN TEST : कोरोना झाल्यानंतर शरीरामध्ये अनेक प्रकारचे बदल होतात. हे बदल तुम्हाला टेस्टद्वारेच समजून घेता येतात. ही टेस्ट शरीरामध्ये तयार होणाऱ्या ट्युमर्स बाबत तुम्हाला सांगते.
KFT : तुम्हाला किडनी शी संबंधित काही तक्रारी जाणवू लागल्यास, तुम्ही किडनीची स्थीती क्रिएटिनिन आणि युरियाचा स्तर शरीरात किती आहे; याची माहिती जाणून घेण्यासाठी ही टेस्ट करून घेऊ शकता.
LFT : कोरोनामुळे तुमच्या लिव्हरला काही नुकसान झाले आहे का, याचा शोध घेण्यासाठी लिव्हर फंक्शन टेस्ट केली जाते!
या झाल्या काही महत्त्वाच्या टेस्ट! मात्र, एरवी सुद्धा तुम्ही यूरिन कल्चर किंवा एकंदरीत तुमच्या शरीरातील शुगर, आणि बीपी ची पातळी याविषयीच्या काही महत्वाच्या मात्र बेसिक अशा टेस्ट कोणत्याही दुखण्यातून बरे झाल्यानंतर करून घ्यायलाच हव्यात!