हा स्मार्टफोन ठरला जगातील सर्वाधिक विकला जाणारा फोन; किंमत फक्त 6799 रुपये!
चीनची शाओमी कंपनीचा Redmi 9A हा फोन सप्टेंबर 2020 मध्ये बाजारात दाखल झाला आणि जगभरात कमी किंमतीत जास्त आणि भन्नाट फिचर असणारा फोन म्हणून प्रसिद्ध झाला.
Redmi 9A स्मार्टफोनची सर्वाधिक विक्री चीन आणि भारतात झाली तर Redmi 9 ने दक्षिण आशियाई बाजारात चांगली कामगिरी केली आहे.
Redmi 9, Redmi 9A आणि Redmi Note 9 च्या जबरदस्त विक्रीमुळे शाओमी कंपनी ग्लोबली $150 च्या प्राइस बँडमध्ये अव्वल ठरली आहे आणि कंपनीने या सेगमेंटमध्ये 19 टक्के वाटा मिळविला आहे.
Redmi 9A चे फिचर्स आणि किंमत
भारतात हा फोन लाँच करण्यात आला तेव्हा या स्मार्टफोनची किंमत 6 हजार 799 रुपये इतकी निश्चित करण्यात आली होती.
या स्मार्टफोनमध्ये 2 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज आहे. तर 3 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत 8 हजार 199 रुपये इतकी आहे.
हा मोबाईल MediaTek Helio G25 octa-core प्रोसेसरवर आधारित आहे. या मोबाईलमध्ये 6.53 इंचांचा HD+ TFT-IPS डिस्प्ले आहे. या मोबाईलची बॅटरी 5000mAh इतकी आहे. विशेष म्हणजे फास्ट चार्जिंग हे या मोबाईलचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.
या स्मार्टफोनला 10W फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. या फोनमध्ये सेल्फीसाठी 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे तर याचा रियर कॅमेरा 13 मेगापिक्सल इतका आहे.
ड्यूल सिम सपोर्टेड रेडमी 9 पॉवर हा स्मार्टफोन अँड्रॉयड 10 बेस्ड MIUI 12 वर चालतो. फोनमध्ये 6.53 इंचाचा एचडी प्लस डॉट ड्रॉप स्क्रीन दिली आहे. स्क्रीनचा आस्पेक्ट रेश्यो 19.5:9 इतका आहे. डिस्प्ले प्रोटेक्शनसाठी या फोनमध्ये कॉर्निंग गोरिला ग्लास 3 देण्यात आला आहे
यामध्ये ऑक्टा कोर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 662 प्रोसेसर देण्यात आला आहे. या फोनची स्टोरेज स्पेस मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने 512 जीबी पर्यंत वाढवता येईल.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 ताज्या बातम्या, चालू घडामोडी आणि इतर माहिती व्हाट्सअॅपवर मिळवण्यासाठी लिंकवर क्लिक करून Lets Talk ला जॉईन व्हा 👉 https://bit.ly/registerletstalk
➖➖➖➖➖➖➖➖➖➖