शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायची म्हणजे अनेकांना नुकसानाची भीती वाटते. हे नुकसान टाळायचे कसे याच्या काही सोप्या ट्रिक्स आपल्याला कळाल्या तर शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवण्याची भीतीही संपून जाईल, आणि नफा देखील चांगला होईल!
शेअर मार्केट मध्ये पैसे गुंतवताना त्या कंपनीची स्थिती काय आहे, हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरते. प्रतिस्पर्धी कंपनीच्या तुलनेत आपण शेअर खरेदी करतो, त्या कंपनीची आर्थिक स्थिती नेमकी कशी आहे यावर त्या शेअरचे भवितव्य अवलंबून असते.
मल्टिबॅगर बनण्याची क्षमता
कुठल्याही कंपनीचा शेअर मल्टी बॅगर आहे की नाही किंवा या कंपनीमध्ये तशी क्षमता आहे की नाही हे जर शेअर खरेदी करण्यापूर्वीच कळाले तर, भविष्यात होणारे नुकसान टाळता येऊ शकते. मल्टीबॅगर शेअर म्हणजे एखादा शेअर तुम्ही 50 रुपयात खरेदी केला तर, तो येत्या भविष्यामध्ये 200 किंवा 300 रुपयांपर्यंत जाण्याची क्षमता ठेवतो, हे जर तुम्हाला कळले तर त्या शेअरला मल्टी बॅगर शेअर म्हणतात.
फ्री कॅश फ्लो
एखाद्या कंपनीमध्ये फ्री कॅश फ्लो आहे की नाही हे जर तुम्हाला कळाले तर शेअर खरेदी करणे अत्यंत सोयीचे आणि सोपे होईल. फ्री कॅश फ्लो एखाद्या कंपनी असला तर त्या कंपनीची प्रगती निश्चित असते आणि त्यामुळेच शेअरची किंमत घसरणे हे अत्यंत क्वचित वेळा होते.
कंपनीवर किती कर्ज
गुंतवणूकीआधी बघा की, कंपनीवर जास्त कर्ज तर नाही. कंपनीवर जास्त कर्ज असेल तर त्याचा परिणाम व्यवहार आणि कामकाजावर पडतो. गुंतवणूकीआधी कंपनी नफा घेतेय की नाही हे तपासायला हवे. कोणत्याही कंपनीचे मल्टीबॅगर बनण्यासाठी ती बदलत्या काळानुसार नफा कमावत आहे की नाही. हे तपासायला हवे.
शेअरचे वॅल्युएशन चेक करा
गुंतवणूक करण्याआधी शेअरचे वॅल्युएशन चेक करा, जर कंपनीचा शेअर प्रतिस्पर्धी कंपन्यांच्या शेअरपेक्षा जास्त आहे की कमी. अनेकवेळा फंडामेंटल मजबूत असणाऱ्या कमी किमतीच्या शेअर्सला मल्टीबॅगर समजले जाते.