आज कालच्या डिजिटल युगात आधार कार्ड हे देशातील नागरिकांसाठी एक महत्त्वपूर्ण ओळखपत्र बनले आहे. आता अनेक ठिकाणी आधार कार्ड हे बंधनकारक झालं आहे. प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीं साठी हे वापर जाते. उधाहरण द्याचे झाले तर मोबाइलच्या सीमकार्ड पासून असो किंवा बँकेतील एखादे महत्वपूर्ण काम असो, आधारकार्डाशिवाय आपले कोणतेच काम पुढे जाऊ शकत नाही. तर प्रत्येक ठिकाणी सरकारी आणि खासगी क्षेत्रातील कोणत्याही छोट्या मोठ्या कंपनीत वा संस्थेत आधारकार्डाशिवाय सध्या पान हलत नाही.
मनुष्याचे ओळखपत्र म्हणून आधारकार्डाचे महत्त्व पुढील काळात अधिक वाढणार असल्याचे सांगितले जाते. अशा परिस्थितीत आपले आधारकार्ड सुरक्षित आहे की नाही, याची खात्री करून घेणे महत्वाचे मानले जाते. मागील काहीदिवसपासून डिजिटल व्यवहाराचे प्रमाण वाढल्यापासून ऑनलाइन होणाऱ्या गुन्हेगारीचे स्वरुपही वाढू लागले आहे. आधारकार्ड हे प्रत्येकाचे महत्त्वाचे दस्तऐवज असल्यामुळे त्याचा वापर दुसऱ्याकडून तर केला जात नाही ना, याची खात्री करणे आवश्यक झाले आहे….
कशी करणार आधारविषयी पडताळणी :
◼️ सर्व प्रथम पुढील दिलेल्या लिंकवर क्लिक करून https://resident.uidai.gov.in/notification-aadhaar भेट द्या.
◼️ लिंकवर क्लिक केल्यानंतर पुढील पेजवर आपल्याला 12 अंकी आधार क्रमांक टाका. हे आपल्याला आधार प्रमाणीकरण इतिहासाच्या खाली दिसेल.
◼️ यानंतर तुम्हाला आता 4 अंकी सुरक्षा कोड टाका. यानंतर पुढे जाऊन जनरेट ओटीपी पर्यावर क्लिक करावे लागेल. त्यानंतर आपल्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर एक ओटीपी (OTP) येईल.
◼️ त्यानंतर पुढील ओपन पेजच्या ड्रॉप डाऊन मेनूवर जा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा. आता ऑथेंटिकेशन टाइप ड्रॉप डाऊन मध्ये ऑल पर्याय निवडा..
◼️ त्यानंतर, पेजवर दिलेली तारीख श्रेणी निवडा. यामध्ये महिन्यांपूर्वी माहिती गोळा केली जाऊ शकते.
◼️ आता तुम्हाला सबमिट पर्याय निवडावा लागेल. त्यानंतर रेकॉर्डची संख्या दिसेल, ती भरावी लागेल. यात आपण केवळ 50 हून अधिक नोंदींची माहिती मिळवू शकता.
◼️ त्यानंतर प्रमाणीकरणासाठी ओटीपी प्रविष्ट करा आणि सबमिट वर क्लिक करा.
◼️ त्यानंतर आपल्याला माहिती मिळेल, ज्यामध्ये आपले आधार कार्ड कोठे आणि केव्हा वापरले गेले.
◼️ आपल्याला कोणत्याही चुकीच्या क्रियेबद्दल माहिती मिळाल्यास आपण त्याबद्दल तक्रार देखील करू शकता.