आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वोत्तम फलंदाज असलेले सचिन तेंडुलकर आणि विरेंद्र सेहवाग यांना पुन्हा एकदा फलंदाजी करताना पाहता येणार आहे. आजपासून रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीज सुरू होत आहे.
वाचा सविस्तर..:
▪️ मोठ्या कालावधीनंतर क्रिकेटमधील सर्वोत्तम सलामीची जोडी पुन्हा एकदा मैदानावर दिसणार आहे. पहिल्या लढतीत हे दोन्ही क्रिकेटपटू भारताकडून डावाची सुरूवात करणार असल्याचे सांगतले जाते.
▪️ 05 मार्च ते 21 मार्चपर्यंत होणाऱ्या या स्पर्धेत एकूण सहा संघ खेळणार असून, छत्तीसगडची राजधानी रायपूर येथे ही स्पर्धा खेळवली जाणार आहे.
▪️ गेल्या वर्षी कोरोनामुळे ही स्पर्धा स्थगित करण्यात आली होती. परंतु आजपासून याची सुरूवात पुन्हा होते आहे. तर भारताची पहिली लढत बांगलादेशविरुद्ध होणार आहे.
असा आहे भारतीय संघ –
सचिन तेंडुलकर, विरेंद्र सेहेवाग, युवराज सिंग, जहीर खान, मोहम्मद कैफ, इरफान पठाण, नोएल डेव्हिड, मुनाफ पटेल, मनप्रीत गोनी, नमन ओझा, प्रज्ञान ओझा, युसूफ पठाण
दरम्यान, आजच्या लढतीनंतर भारताची मॅच 09 आणि 13 तारखेला आहे. 17 आणि 19 तारखेला सेमीफायनल तर 21 तारखेला फायनल मॅच होणार आहे.