🔯 आजच्या बाराही राशींचे राशीभविष्य; जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस
🗓️ शुक्रवार, 11 जून 2021
मेष : फार दगदग करू नका. सर्वांना गोडीने आपलेसे कराल. तुमच्या व्यक्तिमत्वाची छाप पडेल.
वृषभ : खर्चाला आळा घालावा लागेल. मनातील अनामिक भीती काढून टाकावी. चांगला व्यावसायिक लाभ संभवतो.
मिथुन : कामात चांगली ऊर्जितावस्था येईल. चांगल्या कमाईसाठी नवीन धोरण ठरवावे. मित्रांची मदत घेता येईल.
कर्क : चित्त एकाग्र करावे लागेल. घरगुती वस्तूंची खरेदी कराल. चारचौघात तुमच्या प्रगतीचे कौतुक केले जाईल.
सिंह : दूरच्या प्रवासाचा योग येईल. चांगल्या कामात सेवेला प्राधान्य द्याल. आदर्श वागणुकीतून कौतुकास पात्र व्हाल.
कन्या : चुकीच्या मार्गांपासून दूर राहावे. एककल्ली विचार करू नका. भागीदाराचे मत विचारात घ्यावे.
तूळ : नवीन धोरण आजमावता येतील. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. योग्य नियोजनावर भर द्यावा.
वृश्चिक : क्षुल्लक गोष्टींचा त्रास करून घेऊ नका. मानसिक स्वास्थ्य महत्त्वाचे आहे. प्रतिकूलतेतून मार्ग निघेल.
धनु : स्वच्छंदीपणे विचार मांडाल. जुगाराची आवड पूर्ण कराल. मनाची संवेदनशीलता दर्शवाल.
मकर : भावंडांची काळजी लागून राहील. घरगुती वातावरण प्रसन्न राहील. जवळचे नातेवाईक भेटतील.
कुंभ : हातातील अधिकाराचा योग्य वेळी वापर करता येईल. कामात प्रगतीला चांगला वाव आहे.
मीन : विचारांना योग्य दिशा द्यावी. बौद्धिक ताण घेऊ नये. नवीन गोष्टीं मध्ये मन रमवावे. घरगुती जबाबदारी उत्तमरित्या पार पाडाल.