श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा; या दौऱ्यासाठी यंदा नवे शिलेदार मैदानात
जुलै महिन्यात होणाऱ्या श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा काल उशिराने करण्यात आली आहे. अनुभवी फलंदाज शिखर धवन पुन्हा एकदा यजमान श्रीलंकेविरुद्ध आगामी मालिकेत टीम इंडियाकडून कर्णधार पदाची धुरा सोपवण्यात आली. शिखर हा पुन्हा व्हाईट बॉलमध्ये परतणार असेल तर यंदा त्याच्याकडे फलंदाजीसोबत नेतृत्वाची देखील जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
या दौऱ्यासाठी निवड समितानं 20 सदस्यांची टीम जाहीर केली आहे. यावेळी अनुभवी फास्ट बॉलर भुवनेश्वर कुमार व्हाईस कॅप्टन असेल. तर 20 जणांच्या टीममध्ये पाच नेट बॉलर्सचा देखील टीममध्ये समावेश करण्यात आला आहे.
असा असेल या दौऱ्यावरील भारतीय संघ : शिखर धवन (कर्णधार), पृथ्वी शॉ, देवदत्त पडिक्कल, ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव, मनीष पांडे, हार्दिक पंड्या, नितीश राणा, इशान किशन (विकेट कीपर), संजू सॅमनस (विकेट कीपर), युजवेंद्र चहल, राहुल चहर, के. गौतम, कृणाल पंड्या, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, भुवनेश्वर कुमार (उपकर्णधार)दीपक चहर, नवदीप सैनी, चेतन साकरिया.
श्रीलंकेविरुद्ध टीम इंडियाचा असा असेल ODI दौरा :
श्रीलंकेविरुद्ध टीम इंडियाचा असा असेल T20 दौरा :