कोरोना लस घेतल्यानंतर लोखंड वस्तू होतात आकर्षित; वाचा बातमी मागील खरे सत्य
कोरोनाचे लसीकरण सुरू झाल्यानंतर भारतातील कोरोना केसेस बऱ्याच प्रमाणात आटोक्यात येताना दिसत आहेत. 45 वर्षे वय असलेल्या लोकांनी आणि त्या पुढील लोकांनी पहिल्या टप्प्यातच लसीकरण पूर्ण करून घेतले आहे. यापैकी एखादा ने तुम्हाला कोरोना लसीकरण केल्यानंतर अंगाला लोखंड चिकटत आहे, असे सांगितले तर तुम्हालाही हा भोंदूगिरी चा प्रकार वाटेल!
नाशिकच्या सिडकोतील शिवाजी चौकात राहणारे अरविंद सोनार यांनी 9 मार्चला करोनाची लस घेतली होती. यावेळी त्यांच्या पत्नीही सोबत होत्या. यानंतर 2 जून रोजी त्यांनी लसीचा दुसरा डोस घेतला.
https://youtu.be/33_FZwG89NQ
त्यांच्या मुलाने टीव्हीवर एका व्यक्तीने लस घेतल्यानंतर अंगाला लोखंडी साहित्य चिकटत असल्याचं पाहिलं होतं. म्हणून त्याने घरी आई-वडिलांवर प्रयोग करुन पाहिला असता वडिलांच्या शरिराला लोखंड, स्टील आणि नाणी चिकटत असल्याचं लक्षात आलं. यानंतर कुटुंबाने तात्काळ खासगी डॉक्टरांशी संपर्क साधून घडलेला प्रकार सांगितला.
हा प्रकार डॉक्टरांच्या निदर्शनास आल्यावर, त्यांनी देखील ही गोष्ट नाकारली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर लसीकरण झाल्यावर, एखाद्या व्यक्तीला असा प्रकार जाणवल्यास तो त्याच्या शरीरातील एखाद्या विशिष्ट कारणाने होत असेल असे त्यांनी सांगितले आहे.
त्यांच्या त्वचेच्या एखाद्या समस्येने हे होत असेल ते नक्की काय आहे, हे तपासणी करून कळेल असे तज्ञांचे मत आहे.