शुभ बुधवार, 17 मार्च 2021
मेष : बोलक्या स्वभावाचा आज फायदा होईल. गृहोपयोगी वस्तूंची खरेदी कराल. नातेवाईकांची एखादी कृती आपले मन खिन्न करू शकते. तर आज सासरच्या व्यक्तींकडून सहकार्य मिळेल. तर आज वाहन चालवताना खबरदारी घ्यावी.
वृषभ : आजच्या दिवशी तुम्ही उत्तम प्रशासक बनाल. आपला सन्मान वाढेल. लहान आजारांकडे दुर्लक्ष करू नका. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना चांगला दिवस. बोलताना तारतम्य बाळगा.
मिथुन : आज सामाजिक प्रतिष्ठा लाभेल. अति धाडस करू नका. कामात दुर्लक्ष करू नका. हातातील काम व्यवस्थित पूर्ण होईल. मित्रांशी असलेले नाते घट्ट होईल.
कर्क : अविचाराने पैसा खर्च करू नका. बाजू मांडून गैरसमज दूर करा. घरातील वातावरण खेळकर राहील. मन विचलीत होण्यापासून थांबवा. विरोधक परास्त होतील.
सिंह : आजच्या दिवशी अचानक प्रवास करावा लागेल. हवे असलेल्या प्रश्नाचे उत्तर मिळेल. आपला प्रभाव वाढेल. हातातील कलेचे कौतुक केले जाईल. छोटे प्रवास लाभदायक ठरतील.
कन्या : नवीन उधारी देऊ नका. व्यवसायात कोणाच्याही बोलण्यावर संपूर्ण विश्वास ठेऊ नका. ग्रहमानाचे पाठबळ लाभेल. चांगल्या गोष्टीसाठी खर्च केला जाईल. प्रलंबित येणी प्राप्त होतील.
तूळ : आजच्या दिवशी सर्वांशी गोड बोलून कार्यभाग साधाल. तर अति तिखट पदार्थ खाणे टाळावे. जमिनीचे व्यवहार पूर्ण कराल. कौटुंबिक जबाबदारीत वाढ होईल. प्रयत्नात सकारात्मकता दिसून येईल.
वृश्चिक : आजच्या दिवशी घरातील सर्व मोठ्यांचा आदर करावा. तर काही ठिकाणी स्पर्धेत यश मिळेल. मनातील विचारांना योग्य दिशा द्या. मानसिक शांतता जपावी. मौल्यवान वस्तु खरेदी केल्या जातील.
धनू : आपल्या बोलण्यावर संयम ठेवा. व्यावसायिक ठिकाणी प्रशंसा केली जाईल. नियोजित कामे पूर्णत्वास जातील. मित्रांची मदत घ्याल. अति विचार करू नका.
मकर : जुन्या आजारांकडे दुर्लक्ष करू नका. विद्यार्थ्यांचा उत्साह वाढीस लागेल. हातातील काम पूर्णत्वास जाईल. वरिष्ठांची मदत मिळेल. मनोरंजनात वेळ घालवाल.
कुंभ : नियोजनबद्ध कामे केली जातील. समोरील कामाकडे अधिक लक्ष द्यावे. हातातील संधी सोडू नका. आहारावर नियंत्रण हवे. वादाच्या मुद्यांपासून दूर राहावे.
मीन : आजच्या दिवशी शांत राहून कामे करावीत. आततायीपणे कोणतीही कृती करू नका. सामाजिक क्षेत्रात कौतुक केले जाईल. सन्मानात वाढ होईल. भडक डोक्याने वागू नका.