🗓️ गुरुवार, 25 मार्च 2021
मेष : तुमच्यातील ठामपणा दाखवून द्यावा. इतरांवर तुमचा प्रभाव पडेल. राजकारणी व्यक्तींची गाठ पडेल. कागदपत्रे नीट जपून ठेवावीत. फसवणुकीपासून सावध राहावे. जामीनकीच्या व्यवहारात पडू नका.
वृषभ : तुमच्या मनातील आशा पल्लवित होतील. मित्रांची मदत घ्यावीच लागेल. काही कामात अनाठायी अडकून पडाल. पत्नीची उत्तम साथ लाभेल. व्यावसायिक बदल लक्षात घ्यावेत.
मिथुन : चंचलतेवर मात करावी आणि शांत राहावे. मनातील इच्छा पूर्ण होतील. कामात घाई करून चालणार नाही. मनातील अनामिक चिंता दूर साराव्यात. वेळेचे योग्य नियोजन करावे. अडथळ्यातून मार्ग काढावा.
कर्क : मानसिक त्रास जाणवेल. वाताचे त्रास संभवतात. अनाठायी चिडचिड वाढू शकते. फार हट्टीपणा करू नका. हजरजबाबीपणे वागाल. कमिशनच्या कामातून लाभ संभवतो. नवीन वाहन घेण्याची इच्छा मनात रूजेल.
सिंह : व्यावसायिक लाभावर लक्ष केंद्रित करावे. धार्मिक ग्रंथांचे वाचन कराल. जवळच्या लोकांच्या आनंदात सहभागी व्हाल. कौटुंबिक खर्चाचा आवाका लक्षात घ्यावा. नातेवाईकांशी मतभेद संभवतात. डोळ्याची वेळोवेळी काळजी घ्यावी.
कन्या : बौद्धिक थकवा जाणवेल. उगाचच नसत्या गोष्टीत लक्ष घालू नका. कुटुंबियांचे प्रश्न जाणून घ्यावेत. गप्पांच्या ओघात जबाबदारी घेऊ नका. हस्त कलेला उठाव मिळेल. रागावर नियंत्रण ठेवावे.
तूळ : मुलांशी लहान-सहान गोष्टीवरून कुरबुर होऊ शकते. खर्चाचे भान ठेवावे लागेल. पित्ताचा त्रास जाणवेल. आरोग्य सांभाळा. वैचारिक दृष्टिकोन बदलून पहावा. खाण्या-पिण्याची पथ्ये पाळावीत. हातातील अधिकार वापरता येतील.
वृश्चिक : कोणाच्याच भांडणात सहभाग नोंदवू नका, अंगलट येईल. मागचा-पुढचा नीट विचार करावा. उतावीळपणे वागू नका. आवाक्याबाहेर खर्च वाढू शकतो. हातातील कामात यश येईल. कौटुंबिक कार्यक्रम काढले जातील.
धनु : तुमचा कामातील रस वाढेल. आपले उद्दीष्ट साध्य करण्याचा प्रयत्न करावा. आपलेच म्हणणे खरे ठरवाल तरच फायदा होईल. लहान प्रवासाचा आनंद लुटाल. काही जुनी कामे आज होतील. आर्थिक दर्जा सुधारेल.
मकर : कामे खिळून पडतील. सामुदायिक गोष्टीत लक्ष घालू नका. वादाचा मुद्दा टाळावा. सामाजिक कार्यात ओढ राहील. कामाची दगदग वाढेल. गृहोपयोगी वस्तु खरेदी कराल.[sc name=”adg”]
कुंभ : मनात प्रबळ इच्छा जागृत होईल. मुलांच्या कारवायांवर लक्ष ठेवा. सर्वांशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करावा, त्याने लाभ होईल. क्षणिक आनंदाचा लाभ होईल. उडद्योगवाढीच्या दृष्टीने चांगला दिवस आहे.
मीन : वरिष्ठांशी जुळवून घ्यावे लागेल. तडफदारपणे, निडर वागणे ठेवाल. कामे जलद गतीने उरकाल. मोठ्या लोकांच्या ओळखीचा लाभ होईल. सर्वांना आनंदाने समजून घ्याल. नवीन मित्र जोडाल.