राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमावली कठोर करण्यात आली आहे. राज्य सरकारने गर्दी टाळण्यासाठी दिवसा जमावबंदी, तर रात्री संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाचा झपाट्याने वाढता संसर्ग रोखण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाने महाराष्ट्रात शुक्रवार ते रविवार पूर्ण लॉकडाऊन आणि सोमवार ते शुक्रवार अंशतः लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, सोमवारी 5 एप्रिल रात्री 8 पासून 30 एप्रिलपर्यंत या नव्या निर्बंधाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
या निर्णयानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या निर्बंधांचे काटेकोर पालन करण्यात सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन करताना आपण विरोधी पक्षांशी देखील बोललो असून त्यांनी देखील याबाबत सहकार्य करण्याची तयारी दर्शविल्याचे सांगितले. तर राज्य सरकारने यासांबांधी नवीन नियमावली जाहीर केली आहे.
या सर्व गोष्टी सुरु राहणार :
▪️ सर्व प्रकारची वाहतूक सुरु असेल.
▪️ फूड पार्सल सेवा सुरु राहील.
▪️ उद्योग सुरु राहतील मात्र वेळेचे बंधन पाळावे लागेल. कर्मचाऱ्यांची आरटीपीसीआर टेस्ट आवश्यक.
▪️ कन्स्ट्रक्शन साईट सुरु राहतील, मात्र, मालकाला कर्मचाऱ्यांची काळजी घ्यावी लागणार, आजारी पडल्यास कामावरुन काढून टाकता येणार नाही.
▪️ भाजी मंडई सुरु राहील, मात्र गर्दी टाळावी लागेल.
▪️ जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरु राहतील.
▪️ शेतीमालाची वाहतूक सुरु राहील.
▪️ किराणा दुकाणे, औषध, भाजीपाला सुरु राहतील, ग्राहकांनी नियमांचे पालन करावे, यासाठी दुकान मालक जबाबदार.
▪️ रिक्षामध्ये चालक आणि दोन प्रवाशी, मोठ्या गाड्यांमध्ये 50 टक्के क्षमतेने वाहतूक करता येणार.
▪️ बँका, स्टॉक मार्केट, विमा, दूरसंचार, वीज पुरवठा आणि पाणी पुरवठा करणारी कार्यालये सुरु राहतील.
▪️ जे अत्यावश्यक सेवेमध्ये येत नाहीत, अशा सरकारी कार्यालयांमध्ये 50 टक्के क्षमतेची अट.
▪️ रस्त्याच्या बाजूला उभारुन खाद्य विक्री करणारे सकाळी 7 ते रात्री 8 पर्यंत पार्सल सेवा देऊ शकतील.
या सर्व गोष्टी बंद राहणार :
▪️ शनिवारी आणि रविवारी संपूर्ण लॉकडाऊन असणार.
▪️ सर्व गर्दीची ठिकाणं बंद.
▪️ हॉटेल्स, रेस्टोरंट, सिनेमागृहे, थिएटर, मॉल 30 एप्रिलपर्यंत बंद असतील.
▪️ चित्रपट, मालिकांचे शूटिंगला सशर्त परवानगी.
▪️ खासगी कार्यालये बंद, वर्क फ्रॉम होम अनिवार्य.
▪️ सलून, ब्यूटी पार्लर, जीम बंद असतील.
▪️ मैदाने, उद्याने पूर्णपणे बंद राहणार.
▪️ धार्मिक स्थळे बंद, फक्त धर्मगुरुंना परवानगी असणार.
▪️ योग्य कारण नसल्यास बाहेर फिरण्यास बंदी.
▪️ सार्वजनिक ठिकाणी रात्री 8 ते सकाळी 7 पर्यंत फिरण्यास पूर्ण बंदी.
▪️ सार्वजनिक वाहन, रेल्वेमध्ये उभे राहून प्रवास करण्यास मनाई.
▪️ वृत्तपत्र छपाई, वितरण सुरु राहील.
▪️ शाळा, कॉलेज बंद राहतील, खासगी क्लासेस बंद राहतील मात्र 10 आणि 12 वीच्या परीक्षांचा अपवाद असेल.
दरम्यान, काल कोरोना रुग्णसंख्येचा अक्षरश: विस्फोट झाल्याचे चित्र समोर आले आहे. 24 तासांत एक लाखांहून अधिक नवे रुग्ण; तर 500 मृत्यू झाले आहे. तर 52 हजार 847 जण करोनावर मात करून घरी परतले आहेत.
https://myletstalks.in/ipl-new-rules-un-sir/