देशामध्ये लसीकरणाचा वेग वाढत असला तरी देखील, ज्या प्रमाणात लसीकरण व्हायला हवं त्या प्रमाणात ते अजूनही होताना दिसत नाही. यामागे, लसींची कमतरता पुरवठ्याचा अभाव त्याचबरोबर लोकांमधील लसीकरणाबाबत असणारी निराशा कारणीभूत आहे.
अनेकांना लसीकरण करून घेण्याची इच्छा असून सुद्धा बूथ वर उडणारा गोंधळ, गर्दी यामुळे अनेकजण लसीकरणाकडे पाठ फिरवतात. हाच उडणारा गोंधळ टाळण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने एक मोबाईल नंबर जारी केला आहे.
आरोग्य मंत्रालयाकडून 9013151515 दिलेल्या या नंबरवरून घर बसल्या आपण कोरोना लसीची माहिती घेऊ शकतो.
व्हॉट्सॲपमध्ये या नंबरवर आपला पिन कोड टाकून फक्त सेंड करा. त्यानंतर या परिसरात लसीकरणासंदर्भात काय स्थिती आहे, याची संपूर्ण माहिती तुमच्या मोबाईलवर येईल.
लसी साठी तुमची नोंदणी झालेली असेल तरीदेखील, या नंबर वरून तुमचा नंबर कधी येणार आहे आणि कधी लसीकरण करून घेता येऊ शकते. याबाबत माहिती तुम्हाला घरबसल्या मिळू शकते.
यासाठी कोणत्याही व्यक्तीकडे जायची, चौकशी करण्याची, किंवा परिसरामध्ये इतर ठिकाणी जाऊन लोकांच्या संपर्कात येण्याची गरज आता भासणार नाही.
लोकांना मदत म्हणून आणि लसीकरणा दरम्यान होणारा गोंधळ टाळण्यासाठी, आरोग्य मंत्रालयाकडून ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.