आता कपड्याच्या डागांना म्हणा बायबाय!
‘कुछ दाग अच्छे होते है’ असे म्हणणे सोपे असते. मात्र, जेव्हा कपड्याला डाग लागतो तेव्हा तो फक्त कपड्याचे सौंदर्य हिरावून घेत नाही तर, आपले हसू सुद्धा हिरावतो.
कधी अनावधानाने आणि कधी इतरांच्या चुकीमुळे त्याच्यावर डाग पडले तर आपण अगदीच नाराज होऊन जातो. कारण आपले कपडे फक्त कपडे नसतात, तर त्यात आपल्या काही विशेष क्षणांच्या आठवणी असतात.
डाग वेगवेगळ्या प्रकारचे असतात. त्यांना घालवण्याचे मार्ग सुद्धा वेगवेगळे असतात, तेच मार्ग आज आपण जाणून घेऊ!
▪️ साडीवर तेलकट डाग पडल्यास त्या डागांवर टाल्कम पावडर चोळावी. एक दिवस तसेच ठेवावे नंतर धुवावे.
▪️ सायकल ऑईलचे डाग निलगिरी तेलाने निघतात.
▪️ ग्रीस किंवा वॉर्निशचे डाग टर्पेन्टाईलने जातात.
▪️कपड्यावर पानाचे डाग पडले तर लगेचच लिंबू कापून डागावर घासावेत, स्वच्छ पाण्यात धुवावे.
▪️ कपड्यांवर पडलेल्या डागांवर टूथपेस्ट लावावी आणि ती सुकल्यावर कपडे डिटर्जंटने धुवावे. डाग निघण्यास मदत होते.
▪️ उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये कपड्यांवर घामाचे पिवळसर डाग पडतात. लिंबाच्या रसाने हे डाग घालविता येतात. लिंबाचा रस या डागांवर 10 मिनिटे लावून ठेवावा मग नेहमीप्रमाणे कपडे धुवून टाकावेत.
▪️ कपड्यांवरचे हळदी डाग घालवण्यासाठी व्हिनेगर अथवा लिंबू लावा, किंवा कपडे धुण्याची कोरडी पावडर त्यावर लावून घासून काढा.
▪️ चहा, कॉफीचा पडलेला डाग प्रथम स्वच्छ धुवून घ्यावा मग जेथे डाग पडला आहे त्या भागावर बोरॅक्स पावडरची पेस्ट लावावी.
▪️ चिखलाचा डाग पडलेला भाग स्वच्छ धुवून घ्यावा मग डाग पडलेल्या भागावर कच्चा बटाटा लावून थोड्या वेळाने डाग धुवावा.
▪️ शाईचा डाग पडलेल्या भागावर लिंबू व मीठ चोळावे व मग डाग धुवून टाकावा.