👉 जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी काेराेनाबाधितांचा आकडा सहाशे पार झाले. गेल्या 24 तासांमध्ये 640 हुन अधिक जणांना काेराेना संसर्गाचे निदान झाले.
💁♂️ तर नगर जिल्हात मागील 24 तासात 400 हुन अधिक लोकांना बरे करून घरी सोडण्यात आले आहे. तर उपचारार्थींचा आकडा साडेतीन हजाराच्या उंबरठ्यावर पाेहाेचला आहे.
🤔 दरम्यान, आज जिल्हाधिकारी डाॅ. राजेंद्र भाेसले यांनी काेराेनाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा दाैऱ्यावर आहेत. आज पारनेर, श्रीगोंदे आणि नगर तालुक्यातील स्थानिक प्रशासनाशी त्यांनी संवाद साधला.
👉 काल नगरच्या उत्तर भागातील तालुक्यांचा दाैरा केला. जिल्हाधिकारी यांच्या या दौऱ्यानंतर जिल्हा प्रशासन काय निर्णय घेते, याकडे लक्ष लागले आहे.
🧐 जिल्हातील आकडेवारी पुढीलप्रमाणे :
▪️ अहमदनगर शहर 199
▪️ राहाता 64
▪️ काेपरगाव 50
▪️ श्रीरामपूर 48
▪️ संगरमनेर 43
▪️ नगर तालुका 32
▪️ राहुरी 38
▪️ शेवगाव 31
▪️ नेवासे 26
▪️ पाथर्डी 23
▪️ जामखेड 17
▪️ श्रीगाेंदे 12
▪️ अकाेले 11
▪️ पारनेर 08
▪️ कर्जत 06
▪️ भिंगार शहर 02
▪️ इतर जिल्ह्यातील 33
📌 दरम्यान, शहरातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता, महानगरपालिकेने काही ठिकाणी मायक्रो कंटेंटमेंट झोन जाहीर केले आहे. त्यामुळे या झोनची संख्या 19 झाले आहे.