लहान बचत योजनांमध्ये व्याजकपात करण्याचा निर्णय अर्थ मंत्रालयाकडून मागे घेण्यात आला आहे. नव्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच सर्वसामान्यांना झटका देत केंद्रीय अर्थ मंत्रालयाकडून लहान बचत योजनांमध्ये व्याजकपात जाहीर करण्यात आली होती.
मात्र अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी हा आदेश चुकून निघाल्याचं सांगत व्याजदर जैसे थे राहतील असं स्पष्ट केलं आहे. निर्मला सीतारमन यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे.
[sc name=”adg”]
निर्मला सीतारमन म्हणाल्या :
केंद्र सरकारच्या लहान बचत योजनांवरील व्याजदर 2020-2021 च्या शेवटच्या तिमाहीत होते तेच राहतील, म्हणजेच मार्च 2021 पर्यंतचे दर. चुकून प्रसिद्ध करण्यात आलेला आदेश मागे घेण्यात येईल,” असं निर्मला सीतारमन यांनी ट्विटमध्ये सांगितलं आहे.
केंद्र सरकारने 1 एप्रिलपासून छोट्या बचतींवरील व्याजदर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. बचत खात्यातील रकमेवरील व्याजदर 4 टक्क्यांवरून 3.5 टक्क्यांवर केला आहे.पब्लिक प्रॉव्हिडंट फंड अर्थात पीपीएफवरील वार्षिक व्याजदर 7.1 टक्क्यांवरून 6.4 टक्के केला आहे.
[sc name=”adg”]
एका वर्षाच्या कालावधीसाठी बँकेत ठेवलेल्या मुदत ठेवीवरील व्याजदर हा तिमाहीला 5.5 टक्क्यांवरून 4.4 टक्क्यांवर केला आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या बचत योजनांवरील व्याजदरातही कपात केली आहे. दरवर्षी 31 मार्चला गुंतवणुकीच्या वर्षात केंद्रसरकारने निर्धारित केलेल्या व्याजदराने खात्यात व्याज जमा होते.
व्याजदर कमी करण्याचा घेतला होता निर्णय –
1 एप्रिलपासून सेव्हिंग डिपॉझिटवर 3.5 टक्के, एका वर्षाच्या डिपॉझिटवर 4.4 टक्के, 2 वर्षांच्या डिपॉझिटवर 5 टक्के आणि 5 वर्षांच्या डिपॉझिटवर 5.8 टक्के व्याज देण्यात येईल, तसंच पीपीएफवर 6.4 टक्के व्याज मिळेल, असं जाहीर करण्यात आलं होतं. सगळ्या ठेवींवरील व्याजदरात सरासरी एक टक्का घट करण्याचा निर्णय सरकारनं घेतला होता. हे दर 1 एप्रिल 2021 ते 30 जून 2021 या तिमाहीसाठी लागू होणार होते. कोरोनाच्या संकटामुळे देशातली अर्थव्यवस्था अडचणीत आली आहे, त्यामुळे सरकारच्या उत्पन्नाचा स्त्रोतही आटला आहे, त्यामुळे व्याजदरांमध्ये कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, आता हा निर्णय मागे घेण्यात आल्यानं ठेवीदारांना मोठा दिलासा मिळाला आहे.
[sc name=”adg”]