कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी; 1 एप्रिलपासून कामाची वेळ बदलणार !, 10 मुद्द्यांत समजून घ्या केंद्राची योजना
[sc name=”adg”]
जर तुम्हीही नोकरी करत असाल, तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. सध्या मार्च महिना असल्यामुळे आर्थिक वर्ष संपत आहे आणि नोकरी करणाऱ्यांसाठी 1 एप्रिलपासून काही मोठे बदल होऊ शकतात. या काही बदलांनंतर तुमचा पीएफ, कामाचे तास आणि वेतनसारख्या नियमांमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. सोबतच, ग्रॅच्युइटी व पीएफही वाढेल. त्यामुळे नोकरदार वर्गाची टेक होम सॅलरी कमी होईल.
तर, केंद्र सरकारने आणलेल्या विधेयकातील नियमानुसार या बदलांवर अजूनही चर्चा सुरू आहे. गेल्या वर्षी संसदेत वेतन विधेयक आले होते, त्यावेळी त्यावर चर्चासुद्धा झाली होती. या विधेयकाची यंदा 1 एप्रिल 2021 पासून अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे. जाणून घ्या, कोणत्या प्रकारचे बदल घडू शकतात?
[sc name=”adg”]
नवीन नियमांमधील बदल 10 टप्प्यांद्वारे घ्या समजून
▪️ सरकारी योजनेनुसार 1 एप्रिलपासून मूळ पगार (सरकारी नोकऱ्यांमध्ये मूलभूत वेतन आणि महागाई भत्ता) एकूण पगाराच्या 50 टक्के किंवा त्यापेक्षा अधिक असणे आवश्यक आहे.
▪️ केंद्र सरकारचा असा दावा आहे की, पगाराच्या या बदलामुळे कंपनी आणि कामगार दोघांनाही फायदा होईल.
▪️ नवीन नियमांनुसार तुमच्या पीएफमध्ये वाढ होईल. त्याच वेळी आपला इनहँड पगार कमी होईल. वास्तविक नवीन नियमांनुसार मूलभूत पगार एकूण पगाराच्या 50 टक्के किंवा त्याहून अधिक असावा.
[sc name=”adg”]
▪️ या बदलांनंतर बहुतेक नोकरदार लोकांची पगाराची रचना पूर्णपणे बदलू शकते. मूलभूत पगाराच्या वाढीमुळे पीएफमध्ये वाढ होईल. कारण ते मूलभूत पगारावर आधारित आहे.
▪️ जास्तीत जास्त कामकाजाचे तास वाढवून 12 करण्याचा प्रस्तावही ठेवण्यात आला. या व्यतिरिक्त ओव्हरटाईममध्ये 15 ते 30 मिनिटे अतिरिक्त काम समाविष्ट करण्याची तरतूद आहे.
▪️ सध्या तुम्ही 30 मिनिटांपेक्षा जास्तीचे काम केले तर ते ओव्हरटाईममध्ये मोजले जात नाही.
[sc name=”adg”]
▪️ नवीन नियमांनुसार सतत 5 तासांपेक्षा जास्त काम करण्यावर बंदी घालण्यात येणार आहे. कर्मचार्यांना 5 तास काम करून अर्ध्या तासाचा ब्रेक द्यावा, असं सरकारला वाटतं.
▪️ पीएफ रकमेच्या वाढीबरोबर सेवानिवृत्तीची रक्कमही वाढेल. सेवानिवृत्तीनंतर लोकांना या रकमेमधून बरीच मदत मिळेल.
▪️ पीएफ आणि ग्रॅच्युइटी वाढल्याने कंपन्यांची किंमतही वाढेल, कारण त्यांनाही कर्मचार्यांना पीएफमध्ये अधिक वाटा द्यावा लागेल.
▪️ गेल्या वर्षी संसदेत वेतन विधेयक संहिता संमत झाल्यामुळे हे बदल होऊ शकतात.
[sc name=”adg”]